दिव्य मराठी अपडेट्स:कोपर्डी पीडितेच्या बहिणीच्या लग्नास मुख्यमंत्र्यांची हजेरी; कुटुंबासोबत कायम असल्याचे आश्वासन पाळले

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स कोपर्डी पीडितेच्या बहिणीच्या लग्नास मुख्यमंत्र्यांची हजेरी नगर – जिल्ह्यातील बहुचर्चित कोपर्डी अत्याचार घटनेतील पीडित मुलीच्या धाकट्या बहिणीच्या विवाहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी हजेरी लावली. वधूपित्याने दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करत आपण आज या ठिकाणी आलो. वधू-वरांना शुभ‌ाशीर्वाद देत असल्याचे त्यांनी सांगितले. २०१६ रोजी कोपर्डी येथे अत्याचारित घटना घडली होती. हे कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेऊन त्यांनी अाधार दिला होता. या कुटुंबासोबत आपण कायम असल्याचे फडणवीस यांनी या वेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबत या वेळी आमदार प्रवीण दरेकर हे उपस्थित होते. कोल्हापूरच्या एजन्सीकडून फक्त‎”स्वाराती” रुग्णालयाला पुरवठा‎‎ बीड‎ – स्वाराती रुग्णालयात पुरवठा करण्यात‎आलेल्या गोळ्या बनावट आढळून आल्याने ‎‎खळबळ उडाली आहे. दरम्यान,‎कोल्हापूरच्या विशाल इंटरप्राईजेसने ‎‎अंबाजोगाईच्या रुग्णालयाला पुरवठा केला‎होता. त्या एजन्सीकडून जिल्हा रुग्णालय, ‎‎उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय किंवा ‎‎जिल्हा परिषदेच्या अारोग्य विभागाला‎औषधांचा पुरवठा झाला नसल्याची माहिती‎समोर आली आहे.‎ अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाने‎गतवर्षी ई टेंडरिंगद्वारे औषधांची खरेदी केली‎होती. कोल्हापूरच्या विशाल‎इंटरप्राईजेसकडून हा पुरवठा केला गेला‎होता. अंबाजोगाई शहर पोलिसांत विशाल‎इंटरप्राईजेसचा सुरेश पाटीलसह त्याला‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पुरवठा करणाऱ्या तीन कंपन्यांच्या‎संचालकावर गुन्हा दाखल आहे .‎जिल्ह्यातील कोणत्या रुग्णालयात या‎कंपन्यांनी पुरवठा केला का याची माहिती‎घेतली जात आहे. जिल्हा रुग्णालय किंवा‎जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या‎एजन्सीकडून कधीही औषध खरेदी केले‎नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.‎ दरम्यान, स्वाराती रुग्णालयाला झालेल्या‎औषध पुरवठ्यातील गोळ्या बनावट‎आढळल्याने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली‎आहे. याची दखल उच्च स्तरापर्यंत घेतली‎गेली आहे. तर, राजकीय पक्ष, सामाजिक‎संघटनाही आक्रमक होत असून रुग्णांच्या‎जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाईची‎मागणी केली जात आहे.‎ अॅड. प्रकाश आंबेडकरांचे निवडणूक आयोगास पत्र मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्र लिहिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील तात्पुरत्या मतदारांच्या मतदानातील तफावत आणि अंतिम आकडेवारीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यासाठी आंबेडकरांनी हे पत्र लिहिले आहे. तसेच आंबेडकर यांनी आकडेवारीही शेअर केली आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात प्रवेशबंदी बेळगाव – कर्नाटकातील बेळगावात सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पाच ठिकाणी मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले आहे. मात्र कर्नाटक पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू करून मेळाव्याला बंदी घातली आहे. सोमवारपासून बेळगावच्या विधिमंडळात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट करा, या मागणीसाठी त्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे. आमचे आंदोलन होणारच, असे माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले. दरम्यान, या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे तरीही काेल्हापुरात मोठ्या संख्येने शिवसैनिक जाणार आहेत. शिंदेसेनेच्या मुख्य प्रतोद‎पदावर आ. रमेश बोरनारे‎ मुंबई‎ – शिवसेना शिंदे गटाच्या मुख्य प्रतोद‎पदावर वैजापूर विधानसभा‎‎मतदारसंघाचे‎‎आमदार रमेश‎‎बोरनारे यांची‎‎निवड करण्यात‎‎आली आहे. मुख्य‎‎प्रतोद पदावर‎निवड झाल्यावर तातडीने बोरनारे‎यांनी, शिवसेनेच्या सर्व ५७‎आमदारांसाठी व्हीप जारी केला.‎सध्या विधिमंडळाचे विशेष‎अधिवेशन सुरू आहे. या‎अधिवेशनाचा सोमवारी शेवटचा‎दिवस असून, सभागृहात‎विश्वासदर्शक ठराव मांडण्यात‎येणार आहे. त्यामुळे सभागृहात‎उपस्थित राहण्याचे आदेश बोरनारे‎यांनी व्हीपद्वारे दिला आहे. शिवसेना‎विधिमंडळ पक्षाच्या सर्व विधानसभा‎सदस्यांना पक्षादेश बजावला आहे.‎ बीडला शिक्षक खून खटल्याचा आज निकाल‎ बीड‎ – शहरातील शिक्षक सय्यद साजेद‎अली यांचा २०१९ मध्ये खून केला‎गेला होता. या प्रकरणात न्यायालयाने‎कुख्यात गुज्जर खानसह १४ जणांना‎दोषी ठरवलेले आहे. या प्रकरणाचा‎आज युक्तिवाद होऊन निकाल‎सुनावला जाणार आहे.‎ बीड शहरातील सैनिकी‎विद्यालयात शिक्षक असलेल्या‎साजेद अली यांचा १९ सप्टेंबर २०२९‎रोजी धारदार शस्त्राने खून केला गेला‎हाेता. गुज्जर खान गँगने ही हत्या‎केली होती. या गँगने २०१३ मध्ये‎साजेद अली यांना खंडणी मागितली‎होती. मात्र, त्यांनी खंडणी दिली‎नाही. त्यामुळे गँगने त्यांच्यावर‎प्राणघातक हल्ला केला होता. या‎प्रकरणात गुज्जर खानसह‎साथीदारांवर गुन्हा नोंद होता. या‎खटल्याची २०१९ मध्ये सुनावणी सुरु‎झाली होती. हा गुन्हा मागे घेण्यासाठी‎दबाव टाकला जात होता. गुन्हा मागे‎घेण्यास नकार दिल्याने गुज्जर‎खाससह त्याच्या साथीदारांनी साजेद‎अली यांचा खून केला होता.‎

Share

-