दिव्य मराठी अपडेट्स:उत्तर भारताकडून ताशी 15 ते 20 किमी वाऱ्यांचा वेग; थंडीचा कडाका कायम, नागरिकांना हुडहुडी
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स नर्मदा बचाव आंदोलनाचा आढावाघेणाऱ्या माहितीपटाचे आज प्रदर्शन छत्रपती संभाजीनगर – यशवंतराव चव्हाण सेंटर, एमजीएमपत्रकारिता महाविद्यालय व एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस्यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीचेआयोजन करण्यात येते. या उपक्रमांतर्गत ‘नर्मदाबचाव आंदोलना’च्या ३५ वर्षांचा आढावा घेणारा‘लकीर के इस तरफ’ चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन ३० नोव्हेंबर रोजी केले आहे. एमजीएम येथील व्ही. शांताराम प्रेक्षागृहात सायं. ६ वाजता कार्यक्रम सुरू होईल. या वेळी या माहितीपटाच्या दिग्दर्शिका शिल्पा बल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रवेश सर्वांसाठी खुला असून उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. जैन संघटनेचे अाज होणार पुण्यात राष्ट्रीय अधिवेधन नाशिक – सामाजिक उपक्रमात नेहमीच पुढाकार घेणारी भारतीय जैन संघटना गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत अाहे. या संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन 30 नाेव्हेंबर व 1 डिसेंबर राेजी पुण्यातील वर्धमान सांस्कृतिक भवन, बिबवेवाडी येथे पार पडणार अाहे. या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेले नंदकिशाेर साखला पदभार स्वीकारणार अाहेत. याचबराेबर राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचादेखील पदग्रहण साेहळा पार पडणार अाहे. थंडीचा कडाका कायम; सर्वात नीचांकी 6 अंश तापमान जेऊरला नाशिक – उत्तर भारताकडून ताशी 15 ते 20 किमी वाऱ्यांचा वेग कायम असल्याने महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका कायम आहे. शुक्रवारी दिवसभर गार वारे वाहत असल्याने नागरिकांना हुडहुडी भरली होती. नाशिक जिल्ह्यातील जेऊर येथे नीचांकी तापमान 6 अंश तर अहिल्यानगर येथे 8.5 अंश नोंद करण्यात आली. लग्न होत नसल्याच्या नैराश्यातूनपरभणीत तरुणाने घेतला गळफास परभणी – लग्न होत नाही म्हणून नैराश्यात आलेल्याएकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 28नोव्हेंबर रोजी सकाळी नानलपेठ भागात उघडकीसआली. या प्रकरणी अाकस्मिक मृत्यूची नोंद करण्यातआली आहे. गोविंद तापडिया यांनी खबर दिली आहे.चंदन तापडिया असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.चंदन तापडिया याचे लग्न होत नसल्याने तोनैराश्यामध्ये होता. यातच त्याने घरातील खिडकीलासोडलेल्या लोखंडी जाळीला बेडशीटच्या साहाय्यानेगळफास लावून आत्महत्या केली. सर्पदंश लक्षणीय आजारघाेषित; केंद्राचे निर्देश नवी दिल्ली – केंद्राने सर्व राज्यांना सर्पदंश हा “सूचनायाेग्य आजार’ म्हणून घोषित करण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकरणांत सर्व आरोग्य सुविधांची व्यवस्था केली जावी. तसेच मृत्यूची नोंद करणे अनिवार्य राहील.
सर्पदंश हा सार्वजनिक आरोग्याच्या चिंतेचा विषय आहे आणि काही प्रकरणांमध्ये यातून मृत्यू, विकृती आणि अपंगत्व निर्माण होते, असे केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. अहमदाबाद विमान सेवा उद्यापासून बंद छत्रपती संभाजीनगर – चिकलठाणा विमानतळावरून 1डिसेंबरपासून अहमदाबाद विमानसेवा काही काळासाठी इंडिगोने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर बंगळुरूची विमानसेवा आठवड्यातून 4 ऐवजी 3 दिवस केली आहे. शहरातून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, गोवा, नागपूर, लखनऊ, अहमदाबादसाठी विमानसेवा आहे. त्यापैकी अहमदाबादचे विमान बंद होत आहे. इंडिगोची हैदराबाद, मुंबईसाठी दिवसातून दोन वेळा विमानसेवा आहे. लखनऊ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर-गोवा विमान मंगळवार, गुरुवार, शुक्रवार असे आठवड्यातून 3 दिवस आहे. विकास दर 5.4%, 21 महिन्यांत प्रथमच 6% खाली मुंबई – देशाचा सकल उत्पादन वृद्धी दर (जीडीपी) 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये घसरून (जुलै-सप्टेंबर) 5.4 टक्के राहिला. गेल्या 21 महिन्यांतील तो सर्वात कमी जीडीपी दर आहे. यापूर्वी 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी 4.3 टक्के होता. यानंतर सहा तिमाहींमध्ये तो 6 टक्क्यांखाली राहिला नाही. खाणकाम आणि शहरी वापरातील घट ही या घटीमागील प्रमुख कारणे होती. याशिवाय उत्पादनाचा वेग निम्म्याहून कमी होता. 8 पैकी 6 महत्त्वाच्या क्षेत्रांत आर्थिक व्यवहरांतही या तिमाहीमध्ये घट नोंदवली गेली. एप्रिल-जूनमध्ये जीडीपी दर 6.7% होता. त्याच वेळी 2023-24 ला याच तिमाहीत 8.1% च्या दराने वाढला. आर्थिक व्यवहरांचे प्रमाण मोजण्याचे प्रमाण असलेल्या ग्रॉस व्हॅल्यू एडिशनची (जीव्हीए) ची गतीही 5.6 राहिली. तिरुपती लाडू भेसळीची एसआयटी चौकशी सुरू तिरुपती – आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध व्यंकटेश्वर बालाजी मंदिरातील लाडू प्रसाद भेसळ प्रकरणात एसआयटीने चौकशीला सुरुवात केली आहे. पाच सदस्यीय एसआयटीने कारवाईला प्रारंभ केल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने एसआयटीची स्थापन केली आहे. या समितीत सीबीआयचे दोन अधिकारी, पोलिस विभागाचे 2 आणि एफएसएसएआयचा एक अधिकारी समाविष्ट आहे. गेल्या वायएसआरसीपी सरकारच्या काळातील हे मंदिराच्या लाडू प्रसादातील भेसळीचे प्रकरण आहे. अदानीप्रकरण अमेरिकेची अधिकृत सूचना नाही : केंद्राचे स्पष्टीकरण नवी दिल्ली – अदानीप्रकरणी केंद्र सरकारने हात झटकले अाहेत. उद्योगपती गाैतम अदानीविरोधातील अमेरिकी न्यायालयातील आरोपपत्र हे खासगी कंपन्या, व्यक्ती अाणि अमेरिकी न्यायपालिकेतील कायदेशीर वाद अाहे असे स्पष्ट करून या संदर्भात केंद्र सरकारला अाधी कोणतीही माहिती देण्यात अाली नव्हती, अशी प्रथमच अधिकृत प्रतिक्रिया भारत सरकारने दिली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. या प्रकरणात सहकार्य करण्याविषयी भारत सरकारला कोणतीही सूचना मिळालेली नाही. यामुळे सरकारचा काडीमात्र संबंध नाही. अमेरिकेकडून कोणतेही समन्स अथवा वाॅरंट प्राप्त झालेले नाही, असेही जायसवाल यांनी स्पष्ट केले. चॅम्पियन्स ट्रॉफी: …तरपाकिस्तान स्पर्धेतून बाहेर दुबई – चॅम्पियन्स ट्रॉफीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पीसीबीला कडक इशारा दिला आहे. आयसीसीने पाकिस्तानला पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद स्वीकारण्यासाठी ‘हायब्रीड’ मॉडेल स्वीकारावे किंवा या स्पर्धेतून बाहेर पडण्यास तयार राहावे, असा अल्टिमेटम दिला आहे. पीसीबीच्या आडमुठ्या भूमिकेमुळे स्पर्धेच्या ठिकाणाबाबत आयसीसीची शुक्रवारी झालेली बैठक अनिर्णित राहिली. हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव पाकिस्तानने पुन्हा फेटाळला. क्रिकेट : भंडाऱ्याला हरवत संभाजीनगर फायनलमध्ये छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत अमरावती अांतर विभागीय क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने भंडारा संघावर 5 गडी राख्ून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अष्टपैलू के.डी. जाधव सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भंडारा संघाचा डाव 97 धावांवर ढेपाळला. सुनील फटालेने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरात छत्रपती संभाजीनगर संघाने 6 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात सचिन क्षीरसागरने 11, संदीप गुडीवालने 23 आणि प्रमोद खांडेकरने 15 धावांचे योगदान दिले.