फडणवीसांनी गुंडगिरीवर अधिवेशात स्टेटमेंट द्यावे:अन्यथा अधिवेशनाबाहेर ठिय्या मांडणार, सतीश भोसले प्रकरणावरून दमानियांचा इशारा

सतीश भोसले याचे सुरेश धसांसोबतचे त्याचे अनेक फोटो, अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत. या कार्यकर्त्यावर काय कारवाई करणार याबाबत सुरेश धसांनी यावर स्टेटमेंट द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. सतीश भोसले सुद्धा उद्या वाल्मीक कराड होणार आहे, हे आतापासून तुम्ही समजून घ्या, असेही दमानिया म्हणाल्या. तसेच देवेंद्र फडणवीस जोपर्यंत स्टेटमेंट देत नाहीत, तोपर्यंत मी अधिवेशनादरम्यान विधिमंडळासमोर उद्यापासून ठिय्या मांडणार असल्याचा इशाराही दमानिया यांनी दिला आहे. बीडच्या बावी गावात तरुणाला बॅटने अमानुष मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण करणारा व्यक्ती भाजप पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे. सतिश भोसले या गुंडाने काही दिवसांपूर्वी बावी गावातल्या एका व्यक्तीला असेच मारहाण केले होते. या मारहाणीत पीडित व्यक्तीचे सगळे दात पडले. याचाही एक व्हिडिओ अंजली दमानिया यांनी शेअर केला. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी आज माध्यमांशी संवाद साधत सतीश भोसलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भोसलेवर आजच्या आज एफआयआर दाखल झाली पाहिजे आपल्याला महाराष्ट्रात सुधारणा आणायची असेल, तर मीडियाची साथ हवी. असे येणारे सगळे दहशतीचे व्हिडिओ तुम्ही रोज लावून धरा, अशी विनंती त्यांनी माध्यमांना केली. सतीश भोसले याच्यावर आजच्या आज एफआयआर दाखल झाली पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केले. यावेळी अंजली दमानिया यांनी सतीश भोसले याने मारहाण केलेल्या पीडितेचे तसेच भोसलेचे सुरेश धस यांचे संबंध असल्याचे फोटो आणि व्हिडिओ माध्यमांसमोर दाखवले. सतीश भोसले हा सुरेश धसांना बॉस म्हणतो, माझा विठ्ठल म्हणतो. असे असंख्य व्हिडिओ आणि फोटोज माझ्याकडे आल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला. वाल्मीक कराडचे जसे मोठ्या-मोठ्या पंचवीस गाड्या घेऊन जातानाचे व्हिडिओ होते, तसेच सेम व्हिडिओ सतीश भोसलेचे सुद्धा आहेत, असे अंजली दमानिया यांनी सांगितले. हे सगळे एका माळेचे मणी असल्याची टीकाही दमानिया यांनी केली. हे लोक कसला धाक दाखवत आहेत? जे व्हिडिओज मी पाठवलेत, तो एक-एक व्हिडिओ 30 सेकंदाचा आहे. हे सगळे व्हिडिओ दाखवा, अशी विनंती दमानिया यांनी माध्यमांना केली. मी बाई असून माझ्या हातात एवढ्या सोन्याच्या बांगड्या नाहीत, पण यांच्या हातात कोपरापर्यंत जाड सोन्याचे कडे, सगळ्या हातात सोन्याचे अंगठ्या घालून हे पुरुष काय करतात? हे कसला धाक दाखवत आहेत? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. हे सगळे जे चाललंय त्यावर राजकारण्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. …तर विधिमंडळासमोर ठिय्या मांडणार, मुख्यमंत्र्यांना इशारा देवेंद्र फडणवीसांना असा महाराष्ट्र नको असेल, तर त्यांनी आज अधिवेशनात स्टेटमेंट करायला हवे. नाहीतर मी अधिवेशनाच्या बाहेर आंदोलनाला बसेल, असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला. असा प्रकार महाराष्ट्रात आता कुठेही चालू देणार नाही, असे जोपर्यंत देवेंद्र फडणवीस स्टेटमेंट देत नाहीत, तोपर्यंत मी विधीमंडळाच्या बाहेर बसून राहीन, असे मी आवाहन करते. आजचा दिवस मी वाट बघणार आहे. उद्या मी अधिवेशनाच्या बाहेर ठिय्या देणार आहे. यावेळी सतीश भोसले याचे सगळे फोटो सोबत घेऊन बसणार आहे. अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले. दमानियांकडून भोसलेचा आणखी एक व्हिडिओ शेअर दरम्यान, अंजली दमानिया यांनी आज सकाळी सोशल मीडिया एक्सवर सतीश भोसलेचा एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये सतीश भोसले हा कारमध्ये बसला असून याच्याकडे पैशांची बंडले दिसत आहे. तो ते पैसे गाडीच्या समोरच्या भागावर टाकत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हाच तो सतीश भोसले? कोण आहे हा? कुठून आले एवढे पैसे? असे प्रश्न उपस्थित करत त्याला अटक करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली.

Share

-