नागराज मंजुळेंना ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार:पोटी आला म्हणून नव्हे तर विचारपुढे नेणारा माझा वंशज हे महात्मा फुलेंनी सांगितले- नागराज मंजुळे

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दरवषी दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ यावषी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला. दरम्यान नागराज मंजुळे म्हणाले की, आज हा पुरस्कार मिळाला याचा खूप आनंद आहे. महात्मा फुले अन् माझी ओळख ज्या टप्प्यावर झाली त्यामुळे मी इथपर्यंत आलो आहे. नाहीतर मी खूप वेगळ्या मार्गावर होतो. माझ्या वडीलांना महापुरुषांसोबत काही देणं घेणं नव्हते. शिवराय, फुले, आंबेडकर पूर्वज मानायला हवे नागराज मंजुळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मी माझ्या घरात लावला तेव्हा माझ्या वडीलांचे अन् माझे खूप मतभेद झाले. ते म्हणाले की हा फोटो इथे का लावला. माझ्या जातीत जन्मलेल्या एखाद्या मानसाचाच मी घरी फोटो लावावा असे नाही. मी माझ्या वडीलांना भांडून आंबेडकरांचा, फुले यांचा फोटो घरात लावला. फुलेंनी आपल्यासाठी काय केले हे माझ्या वडीलांना सांगत असायचो. मी ज्या जातीत जन्मलो, ज्या वडीलांच्या पोटी जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात. तर शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेदेखील आपले पूर्वज आहे हे आपण मानायला पाहिजे. जातीय संकूचितपणा संपला पाहिजे. महात्मा फुंलेंनी शिवरायांवर पोवाडा लिहला. ते शिवरायांचे वंशज आहे, तर आंबेडकर त्यांचे वंशज आहे, हे विचार आपण जपले पाहिजे. अनेक दिग्गजांना मिळाला पुरस्कार यापूर्वी माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, खा.शरद यादव, छत्तीसगढ राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, लेखिका अऊंधती रॉय, प्रा.डॉ.मा.गो.माळी, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ज्येष्ठ कवी समीक्षक यशवंत मनोहर, डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, कै.प्रा.हरी नरके यांच्यासह अनेक दिग्गजांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे.

Share

-