नवनीत राणांचा विरोधकांवर घणाघात:म्हणाल्या – जनतेने बच्चू कडूंना त्यांची जागा दाखवली, राऊतांची दिशाही बदलेल
बच्चू कडू सारख्या लोकांना जनता त्यांची औकात दाखवून देते. तर मी तर वयाने आणि अनुभवाने लहान आहे. मी माजी सैनिकाची मुलगी असून माझी औकात तर बरेचशे लोक काढत असतात. बच्चू कडू यांनीही माझी औकात काढली. माजी सैनिकाच्या परिवाराची औकात काढणाऱ्यांना जनतेनी त्यांची जागा दाखवून दिली आहे, असे प्रत्युत्तर नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना दिले. आपल्या स्वत च्या मतदारसंघात दिवे लावू शकले नाहीत, तर दुसऱ्याच्या मतदारसंघात काय दिवे लावतील. असा टोलाही नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना लगावला. दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारससंघात तुम्ही माझ्या विरुद्ध अपक्ष उभे रहा, असे आव्हान बच्चू कडुंनी नवनीत राणा यांना दिले होते. फडणवीसांनी तेव्हा त्याग केला आता नाही पुढे त्या म्हणाल्या, आम्ही देवेंद्रजींचे आणि भाजपचे सैनिक आहोत. देवेंद्र फडणवीसांनी दोन अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. बहुमत असुनही एकनाथ शिंदेसाठी मुख्यमंत्रीपद सोडले. तसे पुन्हा होणार नाही आणि देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला. संजय राऊतांचे सूरच नाही तर दिशाही बदलेल
संजय राऊतांकडून कौतुक झाल्याचे समजताच त्या म्हणाल्या, मी वेळेसोबतच खूप लोकांना बदलताना पाहिलेले आहे. पण संजय राऊतांसारखे लोक ही बदलू शकतात, हे मी पहिल्यांदाच पाहत आहे, असा खोचक टोला अशी टीका राणा यांनी लगावला. संजय राऊतांचे सूरच नाही तर दिशाही लवकरच बदलेल, अशी टीकाही त्यांनी केली. बाळासाहेबांचे विचार एका परिवारातील नाही जेव्हा ते लोकं भाजपला म्हणायचे की राम हे भाजपचे नसून संपुर्ण देशाचे आहे, तसेच बाळासाहेबांचे विचार एका परिवाराचे नसून संपूर्ण राज्याचे आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे विचार घेऊन आम्ही चालत आहोत. कोणी कितीही काही म्हटले तर बाळासाहेबांच नाव घेणे आणि आमचे विचार आमच्या तोंडून बंद करु शकत नाही, असे नवनीत राणा म्हणाल्या. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहायचे आहे, त्यासाठी आम्ही देवाला प्रार्थना करत आहोत. आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आहोत, येणाऱ्या काळात आम्ही महायुती म्हणुनच लढणार आहोत. असेही त्या म्हणाल्या. हे ही वाचा… मला पाडण्याची राणा दाम्पत्यांची औकात नाही:हिंमत असेल तर माझ्याविरोधात अपक्ष लढून दाखवा, बच्चू कडूंचा घणाघात विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा अचलपूर मतदारसंघातून पराभव झाला. रवी राणा आणि नवनीत राणा दाम्पत्यांमुळे बच्चू कडू यांचा पराभव झाला, अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यावर बच्चू कडू यांनी उत्तर देत राणा दाम्पत्यांवर निशाणा साधला आहे. माझ्या पराभवाचे श्रेय त्यांनी घेऊ नये. मला पाडण्याची राणा दाम्पत्यांची औकात नाही, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी सुनावले. पूर्ण बातमी वाचा…