बहुमत असो किंवा नसो, अपक्षांना सोबत घेणार:भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा; लाडक्या बहिणींच्या मतदानावर विश्वास

राज्यात मतांचा टक्का वाढला आहे. राज्यातील लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केले असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. वाढलेल्या मतदानाचा आम्हाला फायदा आम्हाला होईल, असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळाले तरी किंवा नाही मिळाले तरी सत्ता स्थापन करताना अपक्षांना सोबत घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज्यात महायुती पुन्हा सत्ता...

तारा सिंग नव्हे सकिना मारणार होती खलनायकाला:अमिषा पटेल म्हणाली- दिग्दर्शकाने शेवटच्या क्षणी क्लायमॅक्स बदलला; 2023 मध्ये आला होता गदर-2

‘गदर 2’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल यांची जोडी दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले होते. आता अलीकडेच अभिनेत्रीने ‘गदर 2’ च्या क्लायमॅक्सबाबत नवा खुलासा केला आहे. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये आपली मुख्य भूमिका होती, मात्र शेवटच्या क्षणी न कळवता तो बदलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक, एका चाहत्याने सोशल...

ऐश्वर्याने शेअर केले मुलीच्या वाढदिवसाचे फोटो:घटस्फोटाच्या बातम्यांमध्ये बच्चन कुटुंब दिसले नाही, अभिषेकही नव्हता

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान ऐश्वर्या राय बच्चनने मुलगी आराध्याचा वाढदिवस एकट्याने साजरा केला. तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये तिने आपल्या मुलीला 13 वर्षांची झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या वडिलांची जयंती आपल्या मुलीसोबत साजरी करताना दिसत आहे. मात्र, या फोटोंमध्ये बच्चन कुटुंबातील एकही सदस्य दिसला नाही. आराध्याचे वडील अभिषेक बच्चनही दिसले नाहीत. त्यामुळे घटस्फोटाच्या बातम्यांना...

राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार:काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांचा दावा; एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचेही केले स्पष्ट

राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे नेते तथा नागपूर उत्तर विधानसभा मतदाररसंघातील उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील जनतेची पहिली पसंती महाविकास आघाडी असल्याचा दावा देखील त्यांनी केला. विविध संस्थांनी दाखवलेल्या एक्झिट पोलवरही त्यांनी साशंकाता व्यक्त केली आहे. एक्झिट पोलमधील अंदाज हा खरा नसतो, असेही त्यांनी म्हटले आहे. एक्झिट पोलबद्दल, नागपूर उत्तरमधील काँग्रेसचे उमेदवार...

राज्यातील राजकारणावर सट्टा बाजारातही वातावरण तापले:मोठ्या प्रमाणात उलाढाल; बहुमत कोणाला? कोणत्या पक्षाचे सरकार येणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र यातच विविध संस्थांच्या वतीने एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात सरकार कोणाचे येणार? यावर अंदाज मांडण्यात येत आहे. याच अंदाजात सर्वात महत्त्वाचा असतो तो सट्टा बाजार. राज्यातील सट्टा बाजारात सुद्धा राज्याच्या निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. 23 नोव्हेंबर रोजी कुणाला बहुमत मिळणार आणि कोणत्या पक्षाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार असले...

तारापूर एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग:अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीजवळील एका कारखान्याला आज भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या बाबत अद्याप अधिकची माहिती मिळू शकली नाही. मुंबईला लागून असलेल्या पालघरमधील तारापूर एमआयडीसीजवळील एका कारखान्यात पहाटे भीषण आग लागली. अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू...

भाजपकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीस बट्टा लावण्याचा प्रकार:तर निवडणूक आयोगही झोपाच काढत असावा; उद्धव ठाकरे गटाचा निशाणा

लोकशाही हाच देशाचा धर्म आहे. त्या धर्मासाठीच स्वातंत्र्याचा संग्राम झाला, पण निवडणुका म्हणजे धर्मयुद्ध असल्याचे सांगत भाजप व संघाचे लोक घराघरात पोहोचले. महाराष्ट्रासारख्या राज्यात हे घडत असताना देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानचे मुख्यमंत्री त्यांच्या सरकारी लवाजम्यासह महाराष्ट्रात तळ ठोकून बसले. संपूर्ण सरकारी यंत्रणेचा गैरवापर त्यात होतो. नव्हे, तो कालच्या निवडणुकीत झालाच आहे. तरीही महाराष्ट्राने सावधपणे मतदान केले....

गौतम अदानी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप:दावा- सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 मिलियन डॉलर्स देण्याचे आश्वासन दिले

न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात झालेल्या सुनावणीत गौतम अदानीसह 8 जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. युनायटेड स्टेट्स ॲटर्नी ऑफिसचे म्हणणे आहे की अदानी यांनी भारतातील सौर ऊर्जेशी संबंधित कंत्राटे मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 मिलियन डॉलर्स (सुमारे 2110 कोटी) लाच देण्याचे आश्वासन दिले होते. अदानींव्यतिरिक्त, सागर अदानी, विनीत एस. जैन, रणजित गुप्ता, सिरिल कॅबेनिस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा...

दिव्य मराठी अपडेट्स:पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे – पद्मश्री डॉ.‎ स्मिता कोल्हे यांना आज बोधनकर स्मृती पुरस्कार‎ प्रदान सोहळा

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स खंडाळा घाटात बस अपघात रुग्णालयात असल्याने‎ भुमरे मतदानापासून वंचित‎ वडीगोद्री‎ – पैठण मतदारसंघात बुधवारी 351 मतदान केंद्रांवर 3‎वाजेपर्यंत 54.79 टक्के मतदान झाले. एकूण 3 लाख‎25 हजार 353 पैकी 1 लाख 78 हजार 253 मतदान‎झाले. मतांची वाढलेली टक्केवारी बघता कुणासाठी‎धोकादायक ठरणार याची चर्चा रंगली होती....

पाकिस्तान- तोशाखान्याच्या दुसऱ्या प्रकरणात इम्रान खान यांना जामीन मिळाला:सुटकेबाबत परिस्थिती स्पष्ट नाही; माजी पंतप्रधान 474 दिवसांपासून तुरुंगात आहेत

तुरुंगात बंद पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशाखाना (तोशाखाना केस-2) संबंधित दुसऱ्या प्रकरणात जामीन मिळाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जामीन म्हणून 10 लाख पाकिस्तानी रुपयांचे बाँड जमा करण्याचे आदेश दिले आहेत. इम्रान खान गेल्या वर्षी 5 ऑगस्टपासून तुरुंगात आहेत. मात्र, जामीन मिळाल्यानंतर इम्रान यांची सुटका होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आधीच तुरुंगात असलेल्या इम्रान खान आणि...

-