एका बाजूचे रस्त्याचे डांबर काढल्याने सोलापूर-धुळे महामार्गावर रोज अपघात:पाचपीरवाडी-कसाबखेडा फाटा दरम्यान महामार्गावरील चित्र

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे सोलापूर-धुळे महामार्ग क्रमांक २११ वरील पाचपीरवाडी-कसाबखेडा फाटा परिसरात संबंधित महामार्गांवर यंत्राच्या साहाय्याने रस्त्यावरील एका बाजूचा डांबरीकरण असलेला वरचा थर काढण्यात आला. तब्बल महिना उलटला तरी त्यावर नवीन दुरुस्ती डांबर टाकण्यात आले नाही. याबाबतची दिरंगाई ही सध्या परिसरातील अनेक नागरिकांच्या जिवावर उठत आहे. हे डांबर न टाकल्यामुळे पाचपीरवाडी- कसाबखेडा फाटा परिसरात दररोज एक दोन अपघात होत आहेत. यामुळे या परिसरात संबंधित विभागाने तातडीने डांबर उखडून ठेवलेल्या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मुंबई, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे निवेदनही देण्यात आले आहे. दरम्यान राजेश लक्ष्मणराव इंगळे यांनी दिलेल्या निवेदनात आणखी असे म्हटले आहे की, सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गांवर वेरूळपासून ते संभाजीनगरकडे येताना फातियाबादच्या नायरा पेट्रोल पंपपर्यंत दोन्हीही बाजूने डांबराचे थर काढण्यात आले. िझकझॅक पद्धतीने डांबरीकरणाचा वरचा थर काढून तब्बल एक महिनावर दिवस झाले आहेत. त्यावर अजूनही नवीन डांबरीकरण केले नाही. त्यामुळे दररोज दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. चारचाकी कारचालक यांना सुद्धा त्या िझकझॅक पद्धतीच्या रस्त्यावरून चालणे मुश्किल होत आहे. त्यावरून वाहन गेले की वेग कमी होतो, हँडल आपोआप विचित्र पद्धतीने हलते व मागील वाहन समोरच्या वाहनावर धडकून अपघात होत आहेत. जखमी अजूनही बेशुद्धच माझे दररोज याच रस्त्यावरून जाणे येणे सुरु असल्यामुळे मी स्वतः दुचाकीवरून या रस्त्यावर पडलो. हेल्मेट असल्याने जिवावर बेतले नाही, पण मागून एखादे वाहन असते तर मला चिरडून निघून गेले असते. शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मारोती गोलांडे हे जोडीने वेरूळ येथे देवदर्शनासाठी जात होते. याच ठिकाणी रस्त्यामुळे त्यांचा अपघात झाला. यात हिराबाई गोलांडे यांना डोक्याच्या मागील बाजूस मार लागला. कानातून व नाकातून रक्त येऊन गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना संभाजीनगर येथील ओरिओन सिटीकेअर हॉस्पिटल ला भरती केले आहे. त्या अजूनही बेशुद्ध अवस्थेत अतिदक्षता विभागात आहेत. सूचनाच नसल्याने वाहनधारकांचे अपघात रस्ता थोडासाही खराब असलेल्या ठिकाणी नुसतेच खोदून ठेवले आहेत. निकृष्ट थर काढने सुरु असतानाच सोबतच डांबरीकरण साहित्य, रोलर सोबत ठेऊन लगेच दबाई करणे अपेक्षित आहे, परंतु असे न करता कंत्राटदाराकडून (खराब असो वा नसो) वरचा डांबरीकरणाचा थर काढण्याचा सपाटा सुरु असून महिना भरापासून त्यावर डांबर टाकले नाही. रस्ता खराब नसलेल्या ठिकाणी सुद्धा असे थर काढून महिनाभरापासून तसेच सोडून दिलेले आहेत. अशा ठिकाणी रेडियम पट्ट्या, बॅरिकेड्स लावले नसल्यामुळे अशा अचानक आलेल्या खड्ड्यात पडून प्रवासी जखमी होत आहेत.

Share