पुण्यात शिवसेनेचा अनोखा निषेध:होळीच्या निमित्ताने महिला सुरक्षेसाठी बलात्काऱ्यांचे पुतळे जाळले

पुणे शहर शिवसेना प्रभाग क्रमांक 29/30 च्या वतीने गुरवारी होळीच्या निमित्ताने दत्तवाडी शिवसेना शाखेच्या वतीने महिला सुरक्षा विषयावर बलात्काऱ्यांची होळी करण्यात आली, सदर उपक्रमाचे आयोजन निलेश वाघमारे यांनी केले होते. महाराष्ट्रात आई बहिणी असुरक्षित आहेत त्यांना सुरक्षा देण्यास सरकार असक्षम आहे. त्यामुळे अश्या सरकारची आणि बलात्काऱ्यांच्या निषेधाची होळी करून निषेध नोंदवण्यात आला. ठाकरे सरकारच्या काळातील शक्ती कायदा केंद्र सरकारने पारित करावा ही मागणी करण्यात आली तसेच महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या सर्वात असक्षम गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली . यावेळी शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, विभागप्रमुख सूरज लोखंडे, चंदन साळुंके, उपविभाग प्रमुख गणेश घोलप, बाळासाहेब गरुड, रूपेश पवार, निलेश वाघमारे, प्रभाग प्रमुख संजय साळवी जेष्ठ शिवसैनिक रमेश लडकत, सोमनाथ तेलंगी, महिला आघाडीच्या मनीषा गरुड, शाखा प्रमुख गणेश वायाळ, अमित बाबर व शिवसैनिक नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पुणे शहर कडून “कॉलेज कॅम्पस कनेक्ट” आयोजन विद्यार्थांच्या अडचणी, प्रश्न व समस्या जाणण्यासाठी एक आपुलकीचा संवाद.. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचं हक्काचं व्यासपीठ थेट कॉलेज मध्ये निर्माण करण्याचे दृष्टीने कार्यकर्ते प्रयत्नशील झाले आहे.विद्यार्थ्यांचे हक्क, अधिकार याबाबात जागृती करून महाविद्यालयीन सोई सुविधा व इतर समस्येबाबत विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरून घेतले जातील आणि जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पक्ष संघटनेत सहभागी व्हावे यासाठी पत्रकाद्वारे आवाहन करण्यात येणार आहे . इच्छुकांची नोंदणी करून मनविसेच्या प्रवाहात सामील करून घेतले जाईल. संपूर्ण पुणे शहरात प्रत्येक महाविद्यालयात या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, आठवड्यातून ४ दिवस हा संवाद उपक्रम सातत्याने सुरू असणार आहे आणि या दरम्यान मनविसे पदाधिकारी विविध महाविद्यालय प्रांगणात विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे अडीअडचणी समजून घेऊन त्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहतील आणि त्यांना संघटनेशी जोडण्यात येईल अशी माहिती प्रशांत कनोजिया, आशिष साबळे आणि धनंजय विजय दळवी यांनी दिली आहे.आबासाहेब गरवारे महाविद्यालय कॅम्पस येथे हा पहिला कार्यक्रम पार पडणार आहे.

Share

-