रोहित ICC T-20 टीम ऑफ द इअरचा कर्णधार:पांड्या, बुमराह व अर्शदीपलाही मिळाले स्थान, पाकिस्तानकडून फक्त बाबर
आयसीसीने शनिवारी 2024 सालातील टी-20 टीम ऑफ द इयरची घोषणा केली. या संघात 4 भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याच्याशिवाय अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांचाही संघात समावेश आहे. भारताशिवाय इतर कोणत्याही देशाच्या एकाहून अधिक खेळाडूंना संधी मिळालेली नाही. पाकिस्तानचा बाबर आझम, ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आणि अफगाणिस्तानचा राशिद खान यांचाही संघात समावेश आहे. एक दिवस अगोदर शुक्रवारी ICC ने वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली होती. भारताच्या तीन खेळाडूंना कसोटीत स्थान मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद दरवर्षी खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे तिन्ही फॉरमॅटसाठी संघ जाहीर करते. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने T20 विश्वचषक जिंकला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 29 जून रोजी भारतीय संघाने T20 विश्वचषक 2024 जिंकला होता. ब्रिजटाऊन मैदानावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला होता. कोहली सामनावीर, बुमराह मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला अंतिम सामन्यात 76 धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तर टूर्नामेंटमध्ये 15 विकेट घेणारा जसप्रीत बुमराहला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवडण्यात आले.