सामंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन:अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली माहिती, म्हणाली- ‘जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही पापा’

सामंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन झाले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. तिने लिहिले, ‘जोपर्यंत आपण पुन्हा नाही भेटत पापा’. यासोबतच तुटलेल्या हृदयाचा इमोजीही जोडण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चौथ्या लग्नाच्या वर्धापन दिनापूर्वीच झाले विभक्त
सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा गोव्यात 6 ऑक्टोबर 2017 रोजी प्रथम हिंदू रितीरिवाजांनुसार आणि नंतर 7 ऑक्टोबर रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार विवाह झाला. लग्नानंतर सामंथाने आपल्या नावापुढे अक्किनेनीचे नाव जोडले होते. मात्र, विभक्त होण्याच्या बातम्यांदरम्यान, सामंथाने अक्किनेनीला तिच्या ट्विटर हँडलवरून काढून टाकले होते आणि ते सामंथा रुथ प्रभू असे बदलले होते. 6 ऑक्टोबर 2021 रोजी दोघांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण होणार होती, मात्र त्यापूर्वीच ते वेगळे झाले. बातमी अपडेट करत आहोत…

Share

-