राज्यात 30 हजारांवर रोजगार निर्मिती होणार:1660 पेट्रोल पंप सुरू होणार, मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतर महसूल मंत्र्यांचा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात जवळपास 1660 पेट्रोल पंपांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एक खिडकी’ सुरू करण्याचा देखील निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘एक खिडकी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निर्मिती होईल. एका अहवालानुसार सुमारे 30 हजारांवर रोजगार निर्मिती होऊ शकेल. त्यामुळे रोजगारवाढीची सूचना स्वीकारून हा निर्णय घेतला आहे. पेट्रोल पंप सुरू करण्याच्या निर्णयावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पेट्रोल पंप सुरू करण्याची प्रक्रिया पुढील तीन महिन्यात पूर्ण व्हावी यादृष्टीने परवानगी देताना अत्यावश्यक आणि कमीत कमी अटी शर्ती ठेवता येतील का याबाबत आदर्श कार्यप्रणाली महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी तयार करावी. विभागीय आयुक्तांनी याबाबत तातडीने सूचना पाठवाव्यात, असे निर्देशही बावनकुळे यांनी दिल्या आहेत. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यात दोन हजार पेट्रोल पंप वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंप उभारणीमध्ये इंधन कंपन्यांना महसूल विभागाकडील एनएसह पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध ना हरकत परवानगीच्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुरू करण्यात येईल, असे बावनकुळे म्हणाले. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली इंधन कंपन्यांच्या अडचणी, समस्यांचा आढावा घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने 1660 पंप मंजूर केले आहेत. मात्र परवानगी नसल्याने ते सुरू झाले नाहीत. हे पंप सुरू झाल्यानंतर सुमारे 30 हजार तरुणांना रोजगार मिळेल. राज्यात चार हजार रुपयांची गुंतवणूक होणार आहे. आजच्या स्थितीत रोजगानिर्मिती व गुंतवणूक याला प्राधान्य असल्याने, एक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

Share

-