शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस:अजित पवारांसह सुनेत्रा पवार, पटेल, भुजबळ, तटकरे, पार्थ पवार यांनी भेट घेत दिल्या शुभेच्छा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. सध्या शरद पवार हे दिल्लीत असून दिल्लीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांच्या सोबतच सुप्रिया सुळे देखील दिल्लीत आहेत. त्यावेळी शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील पोहोचले होते. अजित पवार यांच्यासोबतच खासदार सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, पार्थ पवार हे देखील पोहोचले होते. आपण शरद पवार यांचे आर्शीवाद घेण्यासाठी आलो असल्याचे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार जाणार का? याची कालपासून चर्चा होती. मात्र, हे सर्व नेते दिल्लीत असल्यामुळे अजित पवार शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार अजित पवार हे शरद पवार यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसह इतर सर्व नेत्यांचे स्वागत केले. विधानसभा निवडणुकीनंतर पहिलीच भेट विविध पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे. इतकेच नाही तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे देखील शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी पवारांच्या घरी पोहोचले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांनतर अजित पवार आणि शरद पवार यांची ही पहिलीच भेट आहे. आमची नेहमीप्रमाणे चर्चा – अजित पवार शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या सर्व नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र, आमची राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. परभणी येथील प्रकरण, राज्यसभेतील चर्चा आदी जनरल विषयावर आमच्यात चर्चा झाली असल्याचे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार यांचा आर्शीवाद घेण्यासाठी आलो असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आज शरद पवार तर उद्या काकींचा वाढदिवस असतो. त्यामुळे त्यांचे आर्शीवाद घेतले असल्याचे अजित पवारांनी सांगितले. दरवर्षी येतो, तसे याही वर्षी आलो – छगन भुजबळ शरद पवार यांच्यासोबत आम्ही गेली अनेक वर्षे काम करत आहोत. तेव्हापासून दरवर्षी आम्ही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येतो. त्यात खंड पडू देणार नाही. तसे या वर्षी देखील शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. राजकारण हे राजकारणाच्या जागी असते. शरद पवार यांच्या विषयी आमच्या मनात अजूनही प्रेम आणि आदर कायम असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्या शुभेच्छा आमच्या कुटुंबाने पातळी सोडली नाही – पवार अजित पवार आणि शरद पवार यांची भेट ही कौटुंबिक होती. आमच्या कुटुंबाने कायमच राजकारण वेगळे ठेवले असल्याचे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे. आम्ही एकमेकांविरोधात कधीही खालच्या पातळीवर टीका केली नसल्याचेही युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांनीही दिल्या शुभेच्छा
या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. शरद पवार@85 : पराभव झाला तरी चालेल पण शरदलाच उमेदवारी द्या! यशवंतराव चव्हाणांमुळे शरद पवारांना पहिल्यांदा मिळाले होते तिकीट ! राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात पवारांना खूप महत्त्व आहे. काँग्रेस अंतर्गतविरोध असताना शरद पवारांसाठी काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण आग्रही असल्याने त्यांना मिळाले होते तिकीट. पूर्ण बातमी वाचा…. आम्ही हे सातत्याने अपडेट करत आहोत…