ट्रम्पविरुद्ध पॉर्न स्टार खटल्याची सुनावणी पुढे ढकलली:शिक्षा रद्द करण्याचे अपील होते; पॉर्न स्टारला पैसे देऊन गप्प केल्याचा आरोप
पॉर्न स्टार प्रकरणी दोषी आढळलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांची शिक्षा रद्द करण्याच्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ट्रम्प यांची शिक्षा रद्द करण्याबाबत मंगळवारी न्यूयॉर्क न्यायालयात सुनावणी होणार होती. या प्रकरणाची सुनावणी 19 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलत असल्याचे न्यूयॉर्क न्यायालयाचे न्यायाधीश जुआन एम मर्चन यांनी सांगितले. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला ट्रम्प यांच्या वकिलांनी या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी न्यायालयाला केली होती. ट्रम्प...