अमृता फडणवीसांचे दिव्यज फाउंडेशन आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये करार:महिलांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणार
नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) आणि अमृता फडणवीस यांच्या दिव्यज फाउंडेशन यांनी विशेषतः महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूकदार जागरूकता वाढविण्यासाठी एक सामंजस्य करार (MoU) केला आहे. या भागीदारीचे उद्दिष्ट ज्ञानातील तफावत भरून काढणे आणि महिलांना, विशेषतः सार्वजनिक सेवेत आणि ब्लू-कॉलर भूमिकांमध्ये असलेल्यांना, तसेच दुर्गम गावांमधील महिलांना, सक्षम करणे आहे. जेणेकरून त्यांना योग्य आर्थिक निवड करता येतील. सामंजस्य करारानंतर गुंतवणूकदार...