आक्रमक भाषणांनी रान पेटवणारी:राष्ट्रवादी शरद पवार गटाची एकनिष्ठ, सक्षणा सलगर यांच्यावर पक्षाकडून राष्ट्रीय पातळीची जबाबदारी
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून महिला पदाधिकारी सक्षणा सलगर यांची पक्षाच्या युवती आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी सोनिया दुहान या पक्षाच्या महिला आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावर होत्या. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत झालेल्या मतभेदानंतर सोनिया दुहान यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली. सोनिया दुहान यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्ष पद रिक्त होते. राष्ट्रवादी...