Category: मराठी न्यूज

Marathi News

जयकुमार गोरे अजून किती दिवस माझी बदनामी करणार?:पीडित महिलेचा सवाल, 17 मार्चपासून राजभवनासमोर करणार उपोषण

एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या आरोपामुळे मंत्री जयकुमार गोरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. संबंधित पीडित महिला जयकुमार गोरे यांच्याविरोधात 17 मार्चपासून राजभवनासमोर उपोषणाला बसणार आहे. हा माणूस अजून किती दिवस माझी बदनामी करणार? असा सवाल या महिलेने केला आहे. याबाबत तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपालांना देखील पत्र लिहिले आहे. दरम्यान, सदर गुन्ह्यात न्यायालयाने 2019 मध्येच मुक्तता केल्याचा दावा गोरे...

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर टोलमाफी द्यावी:तर अस्वच्छ एसटी स्थानकांकडे लक्ष देण्याची गरज – प्रविण दरेकरांची सूचना

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आज विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेची सुरुवात भाजप गटनेते प्रविण दरेकर यांनी केली. महायुती सरकारच्या विविध निर्णयांचे वर्णन त्यांनी “आता महाराष्ट्र थांबणार नाही” या शब्दात करुन प्रामुख्याने मराठी भाषेचा प्रसार, मुंबई व कोकण विकासाचे प्रश्न मांडून ठोस उपाययोजना करण्याची विनंती सरकारला केली. दरेकर म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणातून मुख्यमंत्री देवेद फडणवीस यांच्या सरकारचा रोडमॅपच जनतेसाठी खुला...

मराठी हीच महाराष्ट्राची राजभाषा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन; भैय्याजी जोशी यांच्या विधानाचे विधानसभेत तीव्र पडसाद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्य सरकारची भूमिका काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारच्या वतीने बाजू स्पष्ट करत मराठी हीच महाराष्ट्राची राजभाषा असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर इतर...

केम छो भाई तमे, सारू छो ना?:आव्हाडांचा गुजरातीतून संवाद साधत सरकारला टोला; म्हणाले – मुंबईत राहायचे असल्यास गुजराती बोलायचे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईची भाषा ही मराठी नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. भैय्याजी जोशींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुजराती भाषेमधून संवाद साधला. आव्हाड यांनी विधानभवन परिसरात भाजप नेते प्रविण दरेकरांशी गुजरातीमध्ये बोलता त्यांना टोला लगावला आहे. दरेकर भाई केम छो तमे, सारू...

फडणवीसांनी गुंडगिरीवर अधिवेशात स्टेटमेंट द्यावे:अन्यथा अधिवेशनाबाहेर ठिय्या मांडणार, सतीश भोसले प्रकरणावरून दमानियांचा इशारा

सतीश भोसले याचे सुरेश धसांसोबतचे त्याचे अनेक फोटो, अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत. या कार्यकर्त्यावर काय कारवाई करणार याबाबत सुरेश धसांनी यावर स्टेटमेंट द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. सतीश भोसले सुद्धा उद्या वाल्मीक कराड होणार आहे, हे आतापासून तुम्ही समजून घ्या, असेही दमानिया म्हणाल्या. तसेच देवेंद्र फडणवीस जोपर्यंत स्टेटमेंट देत नाहीत, तोपर्यंत मी अधिवेशनादरम्यान विधिमंडळासमोर...

भंडारा पोलिस अधीक्षक कार्यालयातील DB ऑफिसला आग:कागदपत्रे, कॉम्प्युटर संच जळले; सुदैवाने जीवित हानी नाही

भंडारा पोलिस अधीक्षक ऑफिसच्या मागिल भागात असलेल्या DB ऑफिसला बुधवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने संपुर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. पोलिस अधीक्षक यांच्या चेंबरच्या अगदी लागुन असलेल्या परिसरात DB ऑफिस आहे. सुट्टी झाल्यावर ऑफिसमधील कर्मचारी घरी गेले. रात्री 9:30 च्या सुमारास काही पोलिस कर्मचाऱ्यांना ऑफिस मधून धूर निघत असल्याचे दिसुन आले. जवळ जावून पाहिल्यावर आत मध्ये आग लागली होती....

अधिवेशन:उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सत्ताधारी पक्षाविरुद्ध विरोधी पक्ष, असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दुसरीकडे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षाच्या वतीने अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. यासह अनेक महत्त्वाच्या घडामोडी आज पाहायला मिळत आहे…

भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य राजद्रोह:सभागृहात त्यांच्या निषेधाचा ठराव घ्या, नसता तुम्ही मराठी आईचे दूध पिलेले नाही; संजय राऊत संतापले

मराठी ही आमची राजभाषा आहे. मराठी ही राजभाषा असल्यामुळे भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य राजद्रोह असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईची भाषा ही मराठी नसल्याचे भैय्याजी जोशी यांनी म्हटले होते. भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य महायुती सरकारने कसे सहन केले? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. भैय्याजी जोशी हे भाजपचे धोरण ठरवणारे व्यक्ती असल्याचा दावा...

जयकुमार गोरेंच्या नोटीसीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया:म्हणाले – आम्ही काय चुकीचे केले? त्यांच्या नोटीसीला नक्कीच उत्तर देऊ

जयकुमार गोरेंकडून नोटीस आल्यावर आम्ही त्यावर नक्कीच उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. कुठलीही महिला असेल आणि तिला न्याय मिळत नसेल, तर आम्ही तो विषय मांडू असे म्हटले होते. त्यात आम्ही चुकीचे काय केले? असा सवालही रोहित पवारांनी केला. आपण असे विषय काढत गेल्यावर अनेक विषय निघतील असेही ते म्हणाले. जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो...

घाटकोपरची भाषा गुजराती:मुंबई येणाऱ्याने मराठी शिकलीच पाहिजे असे नाही, भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य

महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत मराठी माणूस आणि परप्रांतीय लोकांमध्ये अनेकवेळा भाषेवरून वाद होताना दिसतात. मुंबईमध्ये राहायचे असेल तर मराठी भाषा बोलावी लागेल असा आग्रह मराठी माणसाचा असतो तर काही परप्रांतीय मराठी बोलण्यास स्पष्ट नकार देतात. यावरून अनेकदा वाद झाले आहेत आणि काही भागात अजूनही होतात. त्यात आता आणखी भर पडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत येणाऱ्याला...

-