भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर अखेर कॉंग्रेसच्या कविता उईके:उपाध्यक्षपदावर अजित पवार गटाचे एकनाथ फेंडर 30 मते घेऊन विजयी
कॉंग्रेस आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर अखेर कॉंग्रेसच्या कविता उईके यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे एकनाथ फेंडर यांनी ३० मते घेऊन विजय मिळविला. भाजपच्या उमेदवार माहेश्वरी नेवारे यांचे सदस्यपद ऐन निवडणुकीच्यावेळी रद्द झाल्याने कॉंग्रेसच्या कविता उईके या एकमेव उमेदवार असल्याने त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. तर बहुमत असतानाही भाजपला अर्थात महायुतीला अध्यक्षपदापासून...