अजित पवारांच्या निकटवर्तीयाची टेगेगिरी:नागरिकाला मारहाण करत उचलून आदळले, बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबुराव चांदेरे यांनी शनिवारी एका नागरिकाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे. पुणे येथील बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबुराव चांदेरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. बाबुराव चांदेरे यांनी शनिवारी विजय रौंदळ नामक नागरिकाला मारहाण केली...