Category: मराठी न्यूज

Marathi News

शरद पवारांनी फेटाळली NCP एकत्र येण्याची शक्यता:म्हणाले- अजितदादांशी केवळ प्रकल्पावर चर्चा; मनपा स्वबळावर लढवण्याचे संकेत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याची उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. तर या संदर्भात सामंजस्याने प्रश्न सुटावा असे आमच्या नेत्यांचे मत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याचे संकेत शरद पवार यांनी यांदी दिले आहेत. इतकेच नाही तर अजित पवार यांच्याशी केवळ एका प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली आहे. आमच्यात राष्ट्रवादी...

“तुझी दहशत लय झाली’ म्हणत महिला तहसीलदारास धक्काबुकी:वाळूमाफियांचा टिप्परही पळवून नेण्याचा प्रयत्न, तिघे ताब्यात

“तुझी लय दहशत झाली आहे. तू माझ्याच खड्ड्यावरील वाळूच्या गाड्या का धरतेस?’ असे म्हणत वाळूमाफियांनी कुर्डूवाडीच्या तहसीलदार प्रियांका आंबेकर (ठोकळ) यांना धक्काबुक्की करत पकडलेला वाळूचा टिप्पर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास टेंभुर्णीजवळील (ता. माढा) पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. याप्रकरणी अण्णा पाटील (रा. शिराळ ,ता. माढा), अप्पा पराडे (रा. बाभळगाव, ता. माळशिरस) या संशयित...

उद्धव ठाकरेंचे मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत:शिवसैनिकांना तयारीचे दिले आदेश, म्हणाले – यावेळी मला सूड उगवून पाहिजे

विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सर्व राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. आता उद्धव ठाकरे यांनी देखील महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकत एकला चलो चा नारा दिला आहे. महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. तसेच शिवसैनिकांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. अंधेरीत...

मराठी माणसाच्या नादी लागू नका:जिथे औरंगजेबाला झुकवले, तिकडे अमित शहा किस झाड की पत्ती; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

महाराष्ट्रातील महायुतीचा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे, अशी टीका अमित शहा यांनी केली होती. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो, हे तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवले, तिथे अमित शहा किस झाड की पत्ती आहे,...

राजन साळवींचा अखेर ठाकरेंना जय महाराष्ट्र?:उद्या रत्नागिरीत शिंदे गटात पक्ष प्रवेश करण्याची शक्यता, उदय सामंतांच्या दाव्यानंतर चर्चांना उधाण

ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार असून रत्नागिरीतून त्याची सुरुवात होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केला आहे. उद्या ठाकरे गटाच्या माजी आमदारांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचेही ते म्हणाले. उदय सामंत यांच्या दाव्यामुळे राजन साळवी एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. उद्योगमंत्री आज दावोस दौऱ्यावरून परतले आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना मोठा...

दावोसमधून 15 लाख 70 कोटींची गुंतवणूक आणली:विदर्भ, एमएमआर, मराठवाड्यासह नाशिकसाठी करार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दावोसमध्ये महाराष्ट्राची शक्ती काय आहे? ती मांडण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या देशातील प्रतिनिधींसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. दावोसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर खूप चर्चा झाली. त्याखालोखाल ट्रम्प आणि भारत या दोन चर्चा सर्वाधिक झाल्याचे सर्वांचे मत होते. त्यामुळे भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास पाहायला मिळाला. या ठिकाणी 6 राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्री होते. आम्ही भारत म्हणून भूमिका मांडली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

वाल्मीक कराडची जिकडे तिकडे मालमत्ताच मालमत्ता:आता लातुरातही मोठे घबाड, दुसऱ्या पत्नीच्या नावावर 4 ते पावणेपाच एकर जमीन

संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी वाल्मीक कराडच्या अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर सोलापूर येथील बार्शी येथे जवळपास 35 एकर शेती असल्याची माहिती मिळाली होती. त्यातच आता ज्योती जाधव हिच्या नावावर लातूरातही चार ते पावणे पाच एकर जमीन असल्याची माहिती मिळत आहे. बीड, परळी, पुणे, पिंपरी...

ठाकरेंचे 4 आमदार, 3 खासदार लवकरच शिंदे गटात:उद्या रत्नागिरीत पहिला ट्रेलर दिसेल, उदय सामंत यांचा मोठा दावा

उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच बीड, नाशिक, परभणीमधील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार आणि 10 माजी आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. उद्या या पक्षप्रवेशाचा पहिला टप्पा असल्याचे देखील उदय सामंत यांनी सांगितले. तसेच माझी बदनामी करणाऱ्यांनी या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश रोखून...

वर्धन लिथियम कंपनी अन् राज्य सरकारमध्ये करार:अंबादास दानवेंचे सरकारला 4 सवाल, म्हणाले – उत्तर न दिल्यास महाराष्ट्राची फसवणूक ठरेल

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सुरू आहे. याठिकाणी विविध देशांतील कंपन्या आणि सरकार मध्ये गुंतवणुकीचे करार केले जात आहेत. 20 जानेवारीपासून या फोरमला सुरुवात झाली असून 24 जानेवारीपर्यंत चालणार आहे. वर्धान लिथियम कंपनी आणि महाराष्ट्र सरकारमध्ये 42 हजार 535 कोटींचा करार करण्यात आला. परंतु, या करारावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी 4 प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच या...

एसटी महामंडळात लवकरच भाडेवाढ?:मंत्रिमंडळामध्ये विसंवाद असल्याचे समोर; बसेस खराब असतील तर कशाची भाडेवाढ? अजित पवारांनीच विचारला प्रश्न

एसटी महामंडळात संभाव्य भाडेवाढ करण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळामध्ये विसंवाद असल्याचे समोर आले आहे. एकीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडे वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे सुविधा नसताना भाढेवाढ कशी करणार? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. या आधी एसटी महामंडळाच्या भाडे तत्त्वावर घेण्यात येणाऱ्या बसेसच्या निर्णयाला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थिती दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर...

-