महायुती सरकारच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर:नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांसह 32 मंत्री असण्याची शक्यता
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत भाजप प्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी केव्हा होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चेतच आता नव्या मंत्रिमंडळाची रचना एकनाथ शिंदे सरकारसारखीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या सरकारमध्ये 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री व 32 मंत्री असतील. महायुतीच्या नेत्यांची गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सल्लामसलत झाली. या चर्चेत राज्यातील नव्या सरकारचा चेहरामोहरा ठरवण्यात आल्याची माहिती आहे. विशेषतः मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचीही चर्चा आहे. पण भाजपने अद्याप त्यांच्या नावाची पुष्टी केली नाही. दुसरीकडे, महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. खाली वाचा भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी आता पाहा शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी खाली पाहा एनसीपीचे संभाव्य मंत्री शपथविधी सोहळ्यासाठी विविध जागांची चाचपणी दुसरीकडे, नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी प्रशासनाने विविध जागांची चाचपणी सुरू केली आहे. त्यानुसार पहिली पसंती शिवाजी पार्कला असल्याची माहिती आहे. पण याचवेळी रेसकोर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, राजभवन या पर्यायांचीही चाचपणी केली जात आहे. राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर व मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी यासंबंधी शिवाजी पार्कची पाहणी केल्याची माहिती आहे. आझाद मैदान, महालक्ष्मी रेसकोर्स व एमएमआरडीए मैदानाचाही प्रशासनाकडून विचार सुरू आहे.