राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त:नायगावात 'गार्ड ऑफ ऑनर'ने मानवंदना, 26/11 चे हिरो सदानंद दाते नवे डीजीपी
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला ३७.५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर आज सेवानिवृत्त झाल्या. मुंबईतील नायगाव पोलिस मैदानावर आयोजित एका सोहळ्यात त्यांना निवृत्तीनिमित्त 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन मानवंदना देण्यात आली...