सलमानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी:मुंबई वाहतूक पोलिसांना आला मेसेज, दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर यावेळी धमकी देणाऱ्या व्यक्तीने 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांना मिळालेल्या या धमकीमध्ये, पैसे न दिल्यास अभिनेत्याचा जीव घेतला जाईल, असे म्हटले आहे. मेसेज मिळाल्यानंतर वरळीत उपस्थित अधिकाऱ्यांनी मेसेज पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 25 ऑक्टोबरलाही...