कोलंबसशी संबंधित 500 वर्षे जुने रहस्य उकलले:DNAतून कळाले की तो ज्यू होता, 21 वर्षांपूर्वी स्पेनमध्ये सापडलेले अवशेष त्याचेच
अमेरिकेचा शोध लावणाऱ्या ख्रिस्तोफर कोलंबसशी संबंधित 500 वर्षे जुने गूढ उकलले आहे. 2003 मध्ये स्पेनमधील सेव्हिल कॅथेड्रलमध्ये सापडलेले मानवी अवशेष कोलंबसचे आहेत. स्पॅनिश फॉरेन्सिक शास्त्रज्ञ मिगुएल लोरेन्टे आणि इतिहासकार मार्शल कॅस्ट्रो यांनी शनिवारी एका टीव्ही कार्यक्रमात ही माहिती दिली. यासोबतच दोन्ही तज्ज्ञांनी सांगितले की कोलंबस हा पश्चिम युरोपमधील सेफार्डिक ज्यू होता. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, डीएनए विश्लेषणानंतर वैज्ञानिकांनी याची पुष्टी केली आहे....