आपले हिंदुत्व कळल्यावर मुस्लिम आपल्यासोबत:ख्रिश्चन समाजाचाही पाठिंबा, उद्धव ठाकरेंनी केला विश्वास व्यक्त

आपले हिंदुत्व कळल्यामुळे मुसलमान आपल्यासोबत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणाले आहेत. तसेच ख्रिश्चन धर्मगुरू देखील आपल्याकडे येऊन पाठिंब्याचे पत्र दिले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता केवळ एक दिवस बाकी असताना उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, आपले हिंदुत्व काय आहे, हे कळल्यानंतर मुस्लिम आपल्यासोबत आहेत. सगळ्या समाजाचे लोक आपल्यासोबत आले....

आमिर खान मुलगी आयरासोबत घेत आहे थेरपी:अभिनेता म्हणाला- अजूनही आपल्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या योग्य नाहीत

सध्या आमिर खान आपली मुलगी आयरा खानसोबतचे नाते सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. नुकताच अभिनेत्याने याचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की ते त्यांच्या मुलीसोबत थेरपी घेत आहेत, जेणेकरून त्यांच्यातील समस्या सोडवता येतील. आमिर खान नुकताच नेटफ्लिक्स इंडियाच्या यूट्यूब चॅनलवर त्याची मुलगी आयरा खानसोबत दिसला. यावेळी त्यांनी मानसिक आरोग्याबाबत डॉ.विवेक मूर्ती यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. आमिर खान म्हणाला, ‘मी माझी मुलगी...

‘डॉक्यूमेंट्रीतील फुटेज काढून टाका नाहीतर 10 कोटी द्या’:नयनताराला धनुषने दिला अल्टिमेटम, म्हणाला- 24 तासांनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराच्या खुल्या पत्रानंतर आता धनुषच्या वकिलाने एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये त्याने नयनतारावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सांगितले आहे. तसेच २४ तासांचा अल्टिमेटम देत डॉक्यूमेंट्रीतून ते फुटेज काढून टाकले नाही तर १० कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल, असे सांगितले. वास्तविक, अभिनेत्री आणि धनुष यांच्यात ‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल’ या माहितीपटावरून अनेक दिवसांपासून मतभेद सुरू आहेत. धनुषच्या वकिलाचे...

मस्क यांच्या रॉकेटने इस्रोच्या GSAT-N2 उपग्रहाचे प्रक्षेपण केले:यामुळे कम्युनिकेशन इंफ्रास्ट्रक्चरमध्ये आणखी सुधारणा; विमान प्रवासात इंटरनेट वापरता येणार

एलन मस्क यांच्या SpaceX कंपनीने 18 नोव्हेंबरच्या मध्यरात्री भारताचा GSAT-N2 कम्युनिकेशन उपग्रह फाल्कन 9 रॉकेटवरून प्रक्षेपित केला. 4700 किलो वजनाचा हा उपग्रह 14 वर्षांच्या मोहिमेसाठी तयार करण्यात आला आहे. जिओ स्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिटमधून त्याची स्थापना करण्यात आली आहे. हा उपग्रह हाय स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल व्हिडिओ-ऑडिओ ट्रान्समिशन प्रदान करेल. GSAT-N2 ची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की...

G20 मध्ये मोदी म्हणाले – युद्धामुळे जगात अन्न संकट:त्याचा सर्वात जास्त परिणाम गरीब देशांवर; बायडेन, मॅक्रॉन यांनी घेतली मेलोनी यांची भेट

ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरो येथे सोमवारी G20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारर, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांटो आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गेर स्टोर यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो...

अनिल देशमुखांना जीवे मारण्याचा प्रयत्न:खासदार संजय राऊत यांचा भाजप तसेच फडणवीसांवर निशाणा; हल्लेखोर भाजपच्या घोषणा देत असल्याचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला पाहिला तर त्यांच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ला करताना भारतीय जनता पक्षाच्या नावाने जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याचे माजी गृहमंत्री यांना ठार मारण्याच्या हेतूने हल्ला झाला होता, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या होते तर दुसरीकडे माजी गृहमंत्र्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न...

दिव्य मराठी अपडेट्स:वंचितच्या उमेदवाराच्या वाहनावर पाच जणांची दगडफेक; जखमी अवस्थेत उपचारासाठी नांदेडला हलविले

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स वंचितच्या उमेदवाराच्या वाहनावर पाच जणांची दगडफेक; जखमी अवस्थेत उपचारासाठी नांदेडला हलविले ​​​​​​​हिंगोली – ​​​​​​​हिंगोली ते कळमनुरी मार्गावर सेलसुरा पाटीजवळ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या वाहनावर पाच जणांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी ता. १८ मध्यरात्री दिड वाजता घडली आहे. असून यामध्ये त्यांच्या...

कर्जमाफी, हमीभाव राजकीय दिशा बदलणार:शेतकरी कर्जमाफी आणि कापसाला मिळणारा अल्प भाव हे दोन निवडणुकीत ज्वलंत मुद्दे

शेतकरी कर्जमाफी आणि कापसाला मिळणारा अल्प भाव हे दोन मुद्दे या निवडणुकीत ज्वलंत आहेत. मराठवाडा, विदर्भात शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. त्यांना कर्जमाफीच्या निर्णयाने दिलासा मिळू शकतो. मात्र पिकांना हमीभाव मिळत नसल्याचा रोषही व्यक्त होऊ शकतो. उत्पन्नात घट, अल्प भाव, खरेदीचा अभाव, ९५ मतदारसंघांत शेतकऱ्यांची कापूस कोंडी विकास पाटील | छत्रपती संभाजीनगर सोयाबीनपेक्षा कपाशीची परिस्थिती फारच बिकट आहे. कमी भावात...

उद्धव ठाकरे खाष्ट सासू – राज:17 हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखलची करून दिली आठवण

उद्धव ठाकरे म्हणजे खाष्ट सासू आहे. त्यांच्या स्वभावामुळेच माझ्यासह नारायण राणे, एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले, अशी टीका राज ठाकरे यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी केली. महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या आधी राज यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन केले होते. त्यात उद्धव यांच्या आदेशावरून मनसेच्या १७ हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याची राज यांनी आठवण करून दिली. २०१९ मध्ये जनतेने भाजप-शिवसेनेला...

दिव्य मराठी विश्लेषण:मोदी-फडणवीसांपेक्षा गडकरींच्या जास्त सभा

लोकसभेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १८ सभा घेतल्या होत्या, या वेळी फक्त १० सभाच झाल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ६४, तर केंद्रीय मंत्री गडकरींच्या मात्र ७२ सभा. विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी ६ वाजता थंडावल्या. शेवटचा दिवस ‘कॅश’ करण्यासाठी सकाळपासूनच प्रमुख नेत्यांनी सभा, पदयात्रांचा धडाका लावला होता. महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी...

-