अमेरिकेत भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला:घटना दोन दिवसांपूर्वी घडली, स्थानिक पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा तपास करत आहेत
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तात असे म्हटले आहे की, भारतीय मिशनच्या आवारातच अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला आहे. भारतीय दूतावासाने शुक्रवारी सांगितले की, 18 सप्टेंबरच्या संध्याकाळी एका भारतीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. एजन्सी कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. अधिकाऱ्याचा मृतदेह लवकरात लवकर भारतात परत पाठवला जाईल. स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा या घटनेचा तपास करत...