निकालाआधीच प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा:सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देणार; वंचित बहुजन आघाडीची भूमिका केली स्पष्ट

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सत्ता स्थापनेबाबत मोठा दावा केला आहे. उद्या लागणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्याची वेळ आली तर आम्ही त्यांच्या सोबत जाणे पसंत करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर राज्यात कोणाचे सरकार स्थापन होईल? याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. त्यातच सर्वच मीडिया माध्यमांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार महायुती असो किंवा महाआघाडी सत्तेसाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या एका पोस्टच्या माध्यमातून आपण सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षासोबत राहणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी मध्ये सामील होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. महाविकास आघाडीच्या बैठकीत देखील प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित राहून जागा वाटपावर चर्चा केली होती. मात्र पुढील काळात ही चर्चा अर्धवट राहिली आणि वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकाही मतदारसंघात यश आले नाही. विधानसभा निवडणुकीत तरी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच यावेळी देखील वंचित बहुजन आघाडीने स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत यश मिळवले नसले तरी अनेक मतदारसंघांमध्ये चांगले मतदान मिळवले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला आपले काही उमेदवार निवडून येण्याची अपेक्षा आहे. त्यातच सत्ता स्थापनेसाठी गरज भासल्यास सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाला आपण पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या सर्व घटना घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. काँग्रेस नेते नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ:कार्यालयात आढळलेल्या दोन संशयितांच्या मोबाईल मध्ये आक्षेपार्ह चॅट; मुंबई पोलिस अलर्टवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयात दोन संशयित आढळून आल्याने पोलिस अलर्ट मोडवर आले असून सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. ज्या दोन संशयतांना ताब्यात घेण्यात आले, त्या दोन संशयतांच्या मोबाईल मध्ये काही आक्षेपार्ह चॅट देखील खान यांच्या संबंधित आढळून आले. त्यामुळे या सर्व प्रकरणाकडे पोलिस प्रशासन गांभीर्याने पाहत आहे. पूर्ण बातमी वाचा… अमेरिकेतील अदानी प्रकरणामुळे देशाची लाज जगाच्या वेशीवर टांगली:मोदी काय प्रायश्चित्त घेणार आहेत? ठाकरे गटाचा निशाणा अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणामुळे अदानी महाशयांचा पाय किती खोलात जातो ते समजेलच, परंतु देशाच्या स्वयंघोषित ‘चौकीदारां’चे आता काय होणार? अमेरिकेतील चौकीदाराने अदानींच्या गैरव्यवहारांवर कायद्याचा दंडुका हाणला. आपल्याकडचे स्वतःला देशाचे ‘चौकीदार’ म्हणवून घेणारे मात्र कायम अदानींना पाठीशी घालत आले. अदानी त्यांचे काय ते भोगतील. परंतु तुमच्या अदानीप्रेमाची शिक्षा देशाने, येथील जनतेने का भोगायची? अमेरिकेतील प्रकरणामुळे देशाची लाज जगाच्या वेशीवर टांगली गेली आहे. अदानी यांची ‘सावली’ बनलेले पंतप्रधान मोदी त्याचे काय प्रायश्चित्त घेणार आहेत? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी सामनाच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा….

Share

-