हैतीमध्ये गॅंगच्या हल्ल्यात 70 जण ठार:यामध्ये 10 महिला, 3 लहान मुलांचा समावेश, 3 हजार लोक जीव वाचवण्यासाठी घरातून पळाले
कॅरिबियन देश हैतीच्या मध्यवर्ती भागात झालेल्या टोळी हल्ल्यात 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 10 महिला आणि 3 लहान मुलांचाही समावेश आहे. 50 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी 16 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. राजधानी पोर्ट-ऑ-प्रिन्सपासून सुमारे 60 मैलांवर पोंट-सोंडे नावाच्या गावात गुरुवारी पहाटे 3 वाजता हा हल्ला झाला. 3,000 लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी घरे सोडली. संयुक्त राष्ट्रांच्या...