एअर इंडियाच्या दिल्ली-शिकागो विमानात बॉम्बची धमकी:विमान कॅनडाकडे वळवले, सोशल मीडियावर दिली विमानात स्फोटके असल्याची माहिती
दिल्लीहून शिकागोला जाणारे एअर इंडियाचे विमान ऑनलाइन धमकी मिळाल्यानंतर कॅनडाकडे वळवण्यात आले आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव विमान कॅनडातील इक्लुइट विमानतळावर उतरवण्यात आले. येथे प्रवासी आणि त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली आहे. फ्लाइट 24 रडारनुसार, विमानाने आज पहाटे 3 वाजता दिल्लीहून उड्डाण केले आणि दुपारी 4:30 वाजता शिकागोला पोहोचणार होते....