ओडिशात उभारण्यात आले RBI चे डेटा सेंटर:बँकिंग, पेमेंट सिस्टमचा बॅकअप तयार होणार; पंतप्रधान मोदी आज करणार उद्घाटन
देशाची बँकिंग आणि डिजिटल वित्तीय व्यवस्था आपत्ती, तांत्रिक बिघाड आणि सायबर धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने ओडिशातील खुर्दा जिल्ह्यात नवीन अत्याधुनिक डेटा सेंटर उभारले आहे. याचा मुख्य उद्देश देशातील संपूर्ण बँकिंग आणि पेमेंट प्रणाली (यूपीआय, आरटीजीएस, एनईएफटी) कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू ठेवणे हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी याचे उद्घाटन करतील. भुवनेश्वरजवळील इन्फो व्हॅली-II येथे 18.55 एकर क्षेत्रफळावर उभारलेला हा परिसर नवी मुंबईतील आरबीआयच्या मुख्य डेटा सेंटरसाठी आपत्ती पुनर्प्राप्ती बॅकअप म्हणून काम करेल. 170 कोटी रुपयांच्या खर्चाने तयार सुमारे 170 कोटी रुपयांच्या खर्चाने तयार करण्यात आलेले हे डेटा सेंटर नवी मुंबईतील आरबीआयच्या मुख्य डेटा सुविधेचा बॅकअप म्हणून काम करेल. यामुळे देशातील महत्त्वपूर्ण आर्थिक आकडेवारीची सुरक्षा आणि संरक्षण व्यवस्था मजबूत होईल. अर्थतज्ज्ञ राजीव साहू यांच्या मते, एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत आरबीआयचे मुंबईतील सेंटर प्रभावित झाल्यास हे डेटा सेंटर महत्त्वाच्या बँकिंग आणि आर्थिक सेवा पूर्ववत करेल. येथे चलन व्यवस्थापन, केंद्रीय