Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

कुर्डुवाडी- माढा रोड अतिक्रमण मुक्त‎पालिकेची कारवाई
सोलापूर जिल्हा

कुर्डुवाडी- माढा रोड अतिक्रमण मुक्त‎पालिकेची कारवाई

LATEST STORIES

नवीन बातम्या

49 निकाल
कुर्डुवाडी- माढा रोड अतिक्रमण मुक्त‎पालिकेची कारवाई
सोलापूर जिल्हा

कुर्डुवाडी- माढा रोड अतिक्रमण मुक्त‎पालिकेची कारवाई

कुर्डुवाडी शहरातील माढा रोडने अखेर मोकळा श्वास घेतला असून मुख्य रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सुरळीत झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा केवळ औपचारिक कारवाई न करता, नगरपालिकेने अतिक्रमण कायमस्वरूपी रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हटवण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या ठिकाणी पुन्हा विक्रेत्यांनी ठाण मांडू नये, यासाठी नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी दैनंदिन काम उरकून या परिसरावर सातत्याने देखरेख ठेवत आहेत. विशेष म्हणजे, अमृत भारत योजनेतून नव्याने उभारण्यात आलेली रेल्वे जंक्शनची सुंदर व देखणी इमारत या अतिक्रमणामुळे पार झाकली गेली होती. मात्र, हा परिसर पूर्णपणे अतिक्रमणमुक्त झाल्यामुळे ही भव्य इमारत आता पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रशासनाने माढा रोडवरील सर्व अतिक्रमणे हटवली होती. सामान्यतः अशी कारवाई झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच रस्ते पुन्हा अतिक्रमणाने व्यापले जातात.

Natepute Pratinidhi
भीमा नदीवरील घोडेश्वर- माचणूर पुलावर सुरक्षेचा बोजवारा:नागरिक आक्रमक, बॅरिकेड्स वाहून गेल्याने सुरक्षेचा बोजवारा
सोलापूर जिल्हा

भीमा नदीवरील घोडेश्वर- माचणूर पुलावर सुरक्षेचा बोजवारा:नागरिक आक्रमक, बॅरिकेड्स वाहून गेल्याने सुरक्षेचा बोजवारा

मोहोळ- मंगळवेढा तालुक्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 (नागपूर-कोल्हापूर) अंतर्गत घोडेश्वर-माचणूर येथील भीमा नदीवरील जुन्या पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. मागील वर्षी आलेल्या भयानक पुरात या पुलावरील बॅरिकेटिंगचे अँगल वाहून गेले आहेत. त्यामुळे पायी चालणारे नागरिक, दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. सुरक्षेची कोणतीही यंत्रणा नसल्याने गेल्या महिनाभरात याच पुलावरून तीन जणांनी उड्या घेऊन आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. नागपूर-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर नवीन पूल बांधल्याने महामार्गाची वाहतूक तिथून वळवण्यात आली आहे. मात्र, जुन्या पुलावरून स्थानिक नागरिक, दुचाकीस्वार आणि शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. बॅरिकेट्स तुटल्यामुळे येथे दररोज लहान-मोठे अपघात घडत असून, नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. पुलाची मालकी कोणत्याही विभागाची असली तरी नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाचीच आहे.

Natepute Pratinidhi
पंढरपुरात यंदा बैलपोळा साधेपणाने साजरा
सोलापूर जिल्हा

पंढरपुरात यंदा बैलपोळा साधेपणाने साजरा

अपुरा पाऊस, दुष्काळाचे सावट आणि साखर कारखान्यांनी ऊसाचा हप्ता न दिल्याचा थेट परिणाम यंदाच्या बैलपोळा सणावर दिसून आला आहे. गुरुवारी पंढरपूर तालुक्यात बैलपोळा सण अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. दरम्यान, गोकुळ अष्टमी व बैलपोळा उत्सवानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठलास आकर्षक व पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी अलंकृत करण्यात आले. श्रावण अमावस्येच्या दिवशी शेतकरी बैलपोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो, तसेच बैल, गाई व म्हशींना सजवून मिरवणूक काढत असतो. परंतु, यंदा तालुक्यात अत्यल्प पाऊस झालेला असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील एकाही साखर कारखान्याने बैलपोळ्याचा हप्ता दिलेला नसल्याने शेतकऱ्यांना तीव्र आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले. याचा परिणाम म्हणून नेहमी डीजे, हलगी, ढोल-ताशांच्या गजरात निघणाऱ्या मिरवणुका यंदा रद्द झाल्या. बैलांना धुवून, साध्या स्वरूपात सजवून नैवेद्य दाखवत पुरणपोळी खाऊ घालून दावणीलाच बांधून ठेवण्यात आले. तालुक्यात एकाही गावातून मिरवणूक निघाल्याची माहिती मिळालेली नाही.

Natepute Pratinidhi
नीलेश सरवदेंची 1000 कि.मी.ची सायकलिंग मोहीम
सोलापूर जिल्हा

नीलेश सरवदेंची 1000 कि.मी.ची सायकलिंग मोहीम

व्यवसायातील व्यस्तता सांभाळत प्रबळ इच्छाशक्ती, कठोर सराव आणि अफाट सहनशक्तीच्या बळावर येथील कपडे व्यापारी नीलेश सरवदे यांनी तब्बल एक हजार किलोमीटरची ‘बीआरएम 1000 किमी’ सायकलिंग मोहीम अवघ्या 73 तास 55 मिनिटांत पूर्ण केली. या मोहिमेसाठी 75 तासांची निर्धारित वेळ असताना त्यांनी तीन तास आधीच अंतिम टप्पा गाठत बार्शीच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. फ्रान्सच्या ऑडॅक्स क्लबच्या मान्यतेने आणि पहिल्यांदाच बार्शी सायकलिंग क्लबच्या वतीने आयोजित या मोहिमेची सुरुवात बार्शीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून झाली. बार्शी, सोलापूर, तुळजापूर, बीड, अंबड आणि परतीच्या प्रवासात सोलापूर, टेंभुर्णी, थेऊर फाटा, टेंभुर्णी, बार्शी असा अत्यंत खडतर मार्ग सायकलपटूंना पार करावा लागला. या मार्गावर पाच हजार मीटरपेक्षा अधिक चढाई होती. त्यातच प्रचंड ऊन, अवघड चढ, बदलते हवामान, शारीरिक थकवा आणि झोपेचा अभाव अशा अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. तरीही नीलेश सरवदे यांनी जिद्द कायम ठेवत सलग 73 तास 55 मिनिटे सायकल चालवून एक हजार किलोमीटरचे अंतर यशस्वीपणे पूर्ण केले.

Natepute Pratinidhi
डीजे बंदीबाबत संभाजीनगर पाेलिसांचा 3 दिवसांत ‘यू-टर्न’:नव्या नियमात 2 बेस व 2 टाॅपला मंजुरी
सोलापूर जिल्हा

डीजे बंदीबाबत संभाजीनगर पाेलिसांचा 3 दिवसांत ‘यू-टर्न’:नव्या नियमात 2 बेस व 2 टाॅपला मंजुरी

गणेशोत्सवात डीजेला पूर्णतः बंदी घालण्याच्या घोषणेवरून अवघ्या 52 तासांतच पोलिस प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. रविवारी शांतता समितीच्या बैठकीत पालकमंत्री संजय शिरसाट आणि पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी आक्रमकपणे डीजेमुक्त शहराची घोषणा केली होती. मात्र, डीजेचालकांनी घातलेला घेराव आणि राजकीय दबावापुढे झुकत 115 डीजेचालकांच्या बैठकीत थेट बंदीऐवजी आता 2 बेस आणि 2 टॉप स्पीकर्ससह साउंड सिस्टिमला परवानगी देण्याचा ‘सुवर्णमध्य’ पोलिसांकडून काढण्यात आला आहे. डेसिबल मोजून कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्तांना दिला होता. दरम्यान, दोन बेस, दोन टॉपची मैदानावर चाचणी घेतली असून आवाज मर्यादेत राहतो. प्रत्येक ठिकाणी डेसिबल मोजून कारवाई होईल. डीजे स्पर्धांवर बंदी असून उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी सांगितले. चौकात दोन डीजेंच्या स्पर्धेला पूर्णतः बंदी परजिल्ह्यातून शहरात मोठे डीजे आणून चौकाचौकात समोरासमोर आवाजाची स्पर्धा लावण्याच्या प्रकारावर पूर्णतः बंदी असेल.

Natepute Pratinidhi
मुंबईतील इस्कॉनच्या ‘गोविंदा’सह तीन रेस्टॉरंट अन् राज्यात 19 परवाने निलंबित
सोलापूर जिल्हा

मुंबईतील इस्कॉनच्या ‘गोविंदा’सह तीन रेस्टॉरंट अन् राज्यात 19 परवाने निलंबित

जुहूतील इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस) संकुलातील गोविंदा रेस्टॉरंटसह 3 प्रमुख अन्न आस्थापनांचे परवाने एफडीएने निलंबित केले. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन, अस्वच्छता व कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याने ही कारवाई केली. यासह राज्यात इतर 19 आस्थापनांचे परवाने निलंबित केले. 4 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावली.

Natepute Pratinidhi
दिवाळीला साखर स्वस्ताईसाठी प्रयत्न:कारखान्यांत 15 ऑक्टोबरपासून गाळप
सोलापूर जिल्हा

दिवाळीला साखर स्वस्ताईसाठी प्रयत्न:कारखान्यांत 15 ऑक्टोबरपासून गाळप

राज्यातील साखर उद्योग आणि लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या 2026-27 च्या गाळप हंगामाची कोंडी अखेर फुटली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चाधिकार मंत्री समितीच्या बैठकीत यंदाचा गाळप हंगाम नोव्हेंबर ऐवजी 15 ऑक्टोबर 2026 पासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आर्थिक संकटात सापडलेल्या साखर कारखान्यांना सावरण्यासाठी सॉफ्ट लोन व्याज अनुदान, सहवीज निर्मितीला प्रति युनिट 1.50 रुपयांचे अनुदान आणि साखर पॅकिंगसाठी ज्यूट बॅगची सक्ती शिथिल करण्यावर सकारात्मक चर्चा झाली. ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘विशेष ऊस विकास योजना’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाळप हंगाम वेळेआधी सुरू केल्याने उत्पादित साखर काही प्रमाणात दिवाळीला बाजारपेठेत येईल.

Natepute Pratinidhi
संभाजीनगरमध्ये पिझ्झा हटमध्ये व्हेज-नॉनव्हेजसाठी एकच ओव्हन
सोलापूर जिल्हा

संभाजीनगरमध्ये पिझ्झा हटमध्ये व्हेज-नॉनव्हेजसाठी एकच ओव्हन

‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत वाळूज एमआयडीसीतील प्रसिद्ध पिझ्झा हट (मे. सॅफायर फूड्स इंडिया लि.) आणि खुलताबादेतील शेळके मामा ढाबा रेस्टॉरंटचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी हे आदेश जारी केले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी प्र. कुचेकर यांनी नोटीस देऊनही त्रुटी न सुधारल्याने ही कारवाई झाली. या निलंबन काळात व्यवसाय सुरू ठेवल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला असून अधिकाऱ्यांना पाळतीचे आदेश दिले आहेत. सोयाबीन तेलाचा खोटा दावा येथे व्हेज आणि नॉन-व्हेज अन्नपदार्थ तयार करण्यासाठी एकाच ओव्हनचा वापर होत असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले. “सर्व पदार्थ व्हेजिटेबल सोयाबीन तेलात केले जात होते असे आढळून आले.

Natepute Pratinidhi
बैलपोळ्यासाठीच्या साहित्याचे दर वाढले
सोलापूर जिल्हा

बैलपोळ्यासाठीच्या साहित्याचे दर वाढले

पंढरपूर बैलपोळा हा सण जेमतेम दोन दिवसांवर येऊन ठेपला असला तरीही दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारात मंदीचा माहोल आहे. पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील दुकाने व स्टॉलवर खरेदीसाठी शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. दरम्यान, ऊस बिलातील बैल पोळा हफ्ता पंढरपूर तालुक्यातील एकाही साखर कारखान्याने जाहिर केलेला नाही, त्यामुळे हफ्ता कधी मिळ णार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यंदा तालुक्यात अत्यल्प पाऊस झालेला आहे, पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला असून केळी, बेदाणा आणि डाळिंबाच्या दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. साखर कारखान्यांकडून पोळ्याचा हप्ता तर दूरच, पण मागील हंगामात गाळप झालेल्या उसाचे पैसे मिळणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तंगी जाणवत आहे. पंढरपूर शहरातील नवी पेठ परिसरासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये बैल व इतर जनावरांना लागणाऱ्या साहित्याची दुकाने व स्टॉल थाटण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी उलाढाल होईल असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. मात्र, दोन दिवसांवर सण आला तरी शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद असल्याने शेतकऱ्यांपाठोपाठ व्यापारीही चिंतेत आहे

Natepute Pratinidhi
एक गाव एक गणपतीला प्राधान्य द्या:मोहोळमधील बैठकीत पोलिस अधीक्षकांच्या सूचना‎
सोलापूर जिल्हा

एक गाव एक गणपतीला प्राधान्य द्या:मोहोळमधील बैठकीत पोलिस अधीक्षकांच्या सूचना‎

सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करा,"नो डीजे नो डॉल्बी"या संकल्पनेचा प्रभावी वापर करा, तसेच एक गाव एक गणपतीला प्राधान्य द्या, सामाजिक तेढ निर्माण होईल असे कुठलेही कृत्य करू नका, रस्त्यावर स्टेज मारू नका असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले . मोहोळ शहरासह तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटीलयांच्या समवेत शांतता कमिटीची बैठक आयोजन मंगळवारी पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी केले होते. या वेळी प्रस्ताविकात पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी शहरासह तालुक्यात गणेशोत्सवाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले.शहरासह तालुक्यातील गणेश उत्सव मंडळांनी महाराष्ट्रा समोर आदर्श निर्माण करावा. पारंपारिक वाद्यांना प्राधान्य द्यावे,गणेश मूर्ती जवळ सीसीटीव्ही कॅमेरे व स्वयंसेवक ठेवा, जेणे करून गणेशमूर्ती विटंबनेचा प्रश्न निर्माण होणार नाही. पोलीस रेकॉर्ड लिस्टवर असणाऱ्या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. तुम्ही त्या यादीत येऊ नका.

Natepute Pratinidhi
कडाक्याच्या भांडणानंतर भाजप नगरसेवकांचा सभात्याग
सोलापूर जिल्हा

कडाक्याच्या भांडणानंतर भाजप नगरसेवकांचा सभात्याग

प्रतिनिधी | पंढरपूर पंढरपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी कॉरिडॉरसाठीच्या भूसंपादनाबाबत ठराव मांडला जाणार होता. या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र बचाव समितीने आयोजित केलेल्या महामोर्चात हजारो नागरिकांनी उपस्थित राहून प्रशासनाविरोधात जोरदार निषेध नोंदवला. पंढरपूर नगरपालिका सर्वसाधारण सभेत विठ्ठल मंदिर परिसर संकुल विकास आराखड्यास भू-संपादनाचा विषय होता. या विषयास विरोध करण्यासाठी कॉरिडॉरबाधित नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला होता. संत नामदेव महाराज समाधी पासून निघालेला हा मोर्चा चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नगरपालिकेवर येऊन धडकला. या वेळी मोठ्या संख्येने महिला, युवक आणि बाधित कुटुंबातील नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी |पंढरपूर पंढरपूर नगरपालिकेची बुधवारची सर्वसाधारण सभा अनेक अर्थाने गाजली. विषयपत्रिकेत नसलेल्या गोशाळेच्या जागेवरून भाजपच्या नगरसेवकांनी सभागृह वेठीस धरले, प्रचंड गदारोळ करीत सभात्याग केला. 15 मिनिटांनी पुन्हा सभागृहात येत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांसह एका सुरात पंढरपूर कॉरिडॉरचा विषय स्थगित ठेवला.

Natepute Pratinidhi
शेतकरी मोर्चामधील 8 हुतात्म्यांची स्मृती जपणारा स्तंभ
सोलापूर जिल्हा

शेतकरी मोर्चामधील 8 हुतात्म्यांची स्मृती जपणारा स्तंभ

दुष्काळी परिस्थितीमध्ये हाताला काम द्या, कामाचा दाम द्या, धान्य द्या, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या शेतकरी, शेतमजुरांच्या मोर्चावर पोलिसांनी 6 सप्टेंबर 1971 रोजी केलेल्या बेछूट गोळीबारात 8 जण शहीद झाले. तर भाई सर्जेराव सगर व माजी आमदार नरसिंगराव देशमुख यांच्यासह 54 लोक जखमी झाले होते. 56 वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेच्या स्मृती वैरागकरांनी आजही जपल्या आहेत. या हुतात्म्याच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी वैराग तलाठी कार्यालयाच्या शेजारी एक स्मृतिस्तंभ उभा केला आहे. दरवर्षी 6 सप्टेंबर रोजी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर एकत्र येतात व वैराग येथील खंडोबा वेसपासून मुख्य गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हा मूक मोर्चा काढून स्तंभाला पुष्पचक्र वाहतात. ही परंपरा 56 वर्षांनंतर चालू आहे. या घटनेनंतर रोजगार हमी कायदा या घटनेनंतर राज्य शासनाने रोजगार हमी कायदा लागू केला. या गोळीबार प्रकरणानंतर तत्कालीन महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी कायदा केला. आणि त्यानंतर केंद्र सरकारनेही तो रोजगार हमी कायदा संपूर्ण देशात लागू करावा लागला. लोक सैरभैर धावत सुटले होते.

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा