हिंगोली जिल्हयात मतदानाचा टक्का वाढल्याने भावी आमदारांची धाकधूक वाढली:सर्वात जास्त कळमनुरीत 73 टक्के मतदान, हिंगोलीत 68 टक्के
हिंगोली जिल्हयात मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी वसमत विधानसभा मतदार संघ वगळता इतर दोन ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढल्याने भावी आमदारांचीही धाकधूक वाढली आहे. जिल्हयात तीन मतदार संघात सरासरी ७१.०५ टक्के मतदान झाले असून सर्वात जास्त कळमनुरी तालुक्यात ७३ टक्के मतदान झाले आहे. हिंगोली जिल्हयातील हिंगोली, वसमत, कळमनुरी विधानसभा मतदार संघात ५३ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. यामध्ये हिंगोली विधानसभा मतदार संघात २३,...