इमर्जिंग आशिया कप…भारताने पाकिस्तानचा केला पराभव:तिलक वर्माच्या 44 धावा, अंशुलचे 3 बळी; अभिषेक आणि सुफियान यांच्यात वाद

इमर्जिंग आशिया चषक 2024 मधील पहिल्या सामन्यात भारत-अ ने पाकिस्तान-अ चा 7 धावांनी पराभव केला. ओमानमधील अल अमेरत क्रिकेट मैदानावर शनिवारी भारतीय कर्णधार तिलक वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 20 षटकात 8 विकेट गमावून 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 176 धावा करू शकला. कर्णधार तिलक वर्माने 44 धावा...

5 कोटीची रोकड जप्त प्रकरण:माझा या प्रकरणी काही संबंध नाही, संजय राऊतांना सत्ता गेल्यापासून मीच दिसतो – शहाजी पाटील

मी रोकड जप्त झाल्याची बातमी टीव्हीला पाहिली. माझे नाव यात कुठेही नाव आलेले नाही. या गाडीशी माझा कोणताही संबंध नाही. त्या तालुक्यात माझे हजारो कार्यकर्ते आहेत. पण ती गाडी कोणाची याबद्दल मला काहीही कल्पना नाही, असे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान शहाजी पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मी काल दिवसभर खेड्यापाड्यात फिरत होतो. मला रात्री 10 वाजता...

भाजपला मोठा धक्का:वडील युतीचे तर मुलगा आघाडीचा उमेदवार? नवी मुंबई भाजप अध्यक्ष संदीप नाईक यांचा आज शरद पवार गटात प्रवेश

महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय खलबते सुरू असून पक्ष बदलण्यासाठी नेत्यांच्या उड्या देखील सुरू आहेत. यातच आता भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे नवी मुंबई जिल्हा भाजप अध्यक्ष संदीप नाईक हे आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. संदीप नाईक यांचे वडील गणेश नाईक हे भाजपचे मोठे नेते असून पक्षाने त्यांना ऐरोली विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले...

तुम्ही लोकांची वर्षानुवर्षे तोंडे दाबून ठेवली:आता संगमनेर तालुका गप्प बसणार नाही, सुजय विखे यांनी जयश्री थोरात यांना सुनावले

संगमनेरमधील प्रस्थापितांचा तख्ता पलटकेल्याशिवाय थांबणार नाही. लोकशाहीत तुम्ही आम्हाला बोलायचं थांबवू शकत नाही. ताई… ओ.. ताई.. जरा ऐकायला शिका. वर्षानुवर्षे तुम्ही लोकांची तोंड दाबून ठेवले. आज हा संगमनेर तालुका गप्प बसणार नाही, असे म्हणत भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरातांना सुनावले आहे. दरम्यान सुजय विखे पुढे बोलताना म्हणाले की, आता तुम्ही कानात...

महाविकास आघाडी आज जागावाटप जाहीर करणार?:विधानसभेच्या सर्व 288 जागांवर निर्णय; संजय राऊत म्हणाले- 210 जागांवर एकमत

महाराष्ट्र महाविकास आघाडीची (काँग्रेस-शिवसेना उद्धव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार) बैठक आज मुंबईत होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर वाटणी निश्चित केले जाणार आहे. सोमवारी, उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले होते की महाविकास आघाडी (MVA) विधानसभेच्या 288 पैकी 210 जागांवर सहमती झाली आहे. ही मोठी उपलब्धी आहे. ज्यांनी महाराष्ट्राची लूट केली त्यांचा पराभव करण्यासाठी आम्ही...

PM मोदी रशियाला रवाना, आज पुतिन यांची भेट घेणार:उद्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार; जिनपिंग यांच्याशी 2 वर्षांनी भेटीची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाच्या दौऱ्यावर सकाळी 7 वाजता रवाना झाले आहेत. त्यांचा दौरा 2 दिवस चालणार आहे. रशियातील कझान शहरात ब्रिक्स शिखर परिषद होत आहे. पंतप्रधान मोदी गेल्या 4 महिन्यांत दुसऱ्यांदा रशियाला भेट देत आहेत. यापूर्वी ते जुलैमध्ये भारत-रशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आले होते. पंतप्रधान आज संध्याकाळी ब्रिक्स नेत्यांसोबत डिनरला उपस्थित राहणार आहेत. रशियाचे...

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर:मात्र, या बड्या मुस्लिम नेत्याचे नाव नसल्याचे शरद पवार गटाची टीका

अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांची नावे यादीत आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे नाव या यादीत नाही. नवाब मलिक यांच्यावर ईडीचा खटला सुरू आहे. त्यांच्या नावावर भाजपचा देखील आक्षेप आहे. यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी टोला देखील मारला आहे....

मतदान जनजागृतीसाठी बहिरगाव शाळेत चित्रकला स्पर्धा:विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

कन्नड १०५ विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला बहिरगाव येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व मतदार जनजागृती करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय लोकशाहीच्या या राष्ट्रीय उत्सवात सामान्य जनतेने भाग घ्यावा या उद्देशाने ‘लोकशाहीचा उत्सव’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यामध्ये २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मतदान करणे हे भारतीय...

निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांनी शिवसेनेच्या खटल्याचे वकील व्हावे:यमाई देवी कृपेच्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे गटाने घेरले

यमाई देवीच्या कृपेने सन्माननीय चंद्रचूड सरन्यायाधीश झाले. देवीच्या कृपेने व श्रद्धेने त्यांनी न्यायदान केले, पण हे न्यायदान सत्य व प्रामाणिकपणास ठोकरणारे का ठरले? महाराष्ट्रात एका घटनाबाह्य, बेकायदेशीर, भ्रष्ट मार्गाने निर्माण केलेल्या सरकारला अभय देऊन चालवण्याचे काम कोणाच्या प्रेरणेने झाले? शिवसेना हे नाव, धनुष्यबाणासारखे चिन्ह हीसुद्धा महाराष्ट्रीय जनतेची श्रद्धा होतीच. संविधानाच्या दहाव्या शेड्यूलचा मान राखून न्यायदान करा, असा साक्षात्कार सरन्यायाधीशांना देवीने...

मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ हिट अँड रन प्रकरण:मर्सिडीजच्या धडकेत 21 वर्षीय मुलाचा मृत्यू, आरोपी फरार; 6 महिन्यातील चौथी घटना

ठाण्यात एका 21 वर्षीय मुलाला मर्सिडीज कारने धडक दिली, त्यात त्याचा मृत्यू झाला. दर्शन हेगडे असे मृताचे नाव आहे. 20 ऑक्टोबरच्या रात्री ही घटना घडल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले. दर्शन खाद्य पदार्थांची खरेदी करून घरी परतत असताना हा अपघात झाला. नाशिक महामार्गाकडे जाणाऱ्या मर्सिडीजने त्याला धडक दिली अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी कार ताब्यात घेतली, मात्र आरोपी चालक अद्याप...

-