दिव्य मराठी अपडेट्स:5 डिसेंबरपर्यंत राज्यात ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज; तापमानात 3-4 अंश वाढ, थंडीची तीव्रता कमी

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स ढगाळ वातावरणामुळे तापमानात 3-4 अंश वाढ, थंडीची तीव्रता कमी नाशिक – बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये जोरदार पाऊस झाला असून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली आहे. किमान तापमानात तीन ते चार अंश सेल्सियसने वाढ झाली आहे. 5...

पराभव झाला लाडक्या बहिणींमुळे, चर्चा मात्र हिंदुत्व अन् गटबाजीचीच:पराभव पत्कारलेल्या उद्धवसेना, काँग्रेस, एमआयएमची चिंतन बैठक

महाविकास आघाडीचा पराभव हा लाडक्या बहिणींमुळे झाला. मात्र तरीही उबाठा, एमआयएम काँग्रेस पक्षांच्या चिंतन बैठकीत मात्र या मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी हिंदुत्व अन् गटबाजीवरच चर्चा करण्यात आली. पाणी, आरोग्य, शिक्षण रस्ते यावर चिंतन बैठकीत चर्चा झाली नाही. उबाठामध्ये हिंदुत्व सोडल्यामुळे पराभव झाल्याची चर्चा झाली, तर एमआयएममध्ये गद्दारी झाल्यामुळे पराभव झाल्याचा चिंतन बैठकीत चर्चा झाली. विधानसभेच्या निकालानंतर त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत....

दावा- हिंदू धर्मगुरू श्याम दास प्रभू यांना बांगलादेशात अटक:47 बांगलादेशी भारतात घुसण्याचा प्रयत्न करताना पकडले, इस्कॉन बंदीच्या मागणीसाठी कट्टरपंथी रस्त्यावर

बांगलादेशातील चितगाव येथे इस्कॉनशी संबंधित आणखी एक धार्मिक नेता श्याम दास प्रभू यांना अटक केल्याची बातमी आहे. रिपोर्टनुसार, श्याम दास प्रभू तुरुंगात चिन्मय प्रभू यांना भेटण्यासाठी गेले होते, तेथून त्यांना वॉरंटशिवाय अटक करण्यात आली. इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी शुक्रवारी श्याम प्रभू यांच्या अटकेबाबत सांगितले. मात्र, बांगलादेशच्या मीडियामध्ये याबाबत कोणतीही बातमी नाही. त्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली...

नवा धोका:ड्रग्जनिर्मितीसाठी विद्यापीठातून केमिस्ट्री पदवीधरांची भरती करतात मेक्सिकन टोळ्या

अमेरिका, युरोपसह जगात सिंथेटिक ड्रग्ज फेंटेनाइलमुळे दरवर्षी हजारो तरुणांचा मृत्यू होत आहे. याची निर्मिती करणारे ड्रग्ज कार्टेल आता रसायनशास्त्राच्या पदवीधरांची वेगाने भरती करत आहेत. मेक्सिकोचे सिनालोआ कार्टेल कँपस भरती चालवत आहेत. कार्टेल लॅबमध्ये फेंटेनाइल निर्मितीच्या लोकांना कुक म्हटले जाते, त्यांना ॲडव्हान्स केमिस्ट्रीचे चांगले ज्ञान असते. जास्तीत जास्त लोकांना याचे व्यसन लागावे यासाठी आधीपासून अस्तित्वात असलेल्या ड्रग्जला शक्तिशाली बनवतात.ड्रग्ज कार्टलचा फक्तज...

मित्राची दुसऱ्या मित्रांशी भेट न होऊ देण्याचा ट्रेंड:त्याला गमावण्याची भीती अन् असुरक्षा हे कारण, यामुळे एकटेपणा वाढला

अमेरिकेत गेल्या काही वर्षांत एक नवीन ट्रेंड समोर आला आहे. सध्याच्या धावपळीच्या जगात आजही लोक आपल्या मित्रांना दुसऱ्या मित्रांपासून लांब ठेवतात. म्हणजे लोक आपल्या मित्रांना परस्परांची भेट होण्यापासून दूर ठेवतात. याला ‘फ्रेंड होर्डिंग’ नावाने ओळखले जाते. या ट्रेंडवर अभ्यास करणाऱ्या व ‘फायटिंग फॉर अवर फ्रेंडशिप्स’ पुस्तकाच्या लेखिका डॅनियल बेयार्ड जॅक्सन यांच्यानुसार, फ्रेंड होर्डिंग वाढण्यामागचे कारण असुरक्षा आणि मित्र गमावण्याची भीती...

साहित्य संमेलन स्वतंत्रच हवे; विद्रोही भूमिकेवर ठाम:श्रीमंत माणूस गरिबाकडे गेला तर त्याचे मोठे मन अन‌् गरीबश्रीमंताकडे गेला तर लाचारी? हा फरक नको – वानखेडे

महाराष्ट्राचा एकाेपा दिल्लीत दाखवण्यासाठी ‘विद्रोही’ साहित्यिकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी व्हावे हा आयोजक संजय नहार यांचा प्रस्ताव विरोधी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांनी साफ फेटाळून लावला. ‘श्रीमंत माणूस गरिबाकडे गेला तर त्याचे मोठे मन आणि गरीब माणूस श्रीमंताकडे गेला तर लाचारी का? हा फरक नको म्हणून विद्रोही साहित्य संमेलन वेगळेच हवे’ अशी रोखठोक भूमिका त्यांनी ‘दिव्य...

तिरुपती पद्मावतीदेवीला पद्मशाली बांधवांनी केली माहेरची साडी अर्पण:15 जाेडप्यांनी घेतला सहभाग; साेलापूरच्या पद्मशाली पद्मावतीदेवी ब्रह्मोत्सवम संस्थेच्या वतीने आयाेजन

तिरुपतीनजीकच्या तिरुचानूर येथील पद्मावतीदेवीला साेलापूरच्या पद्मशाली समाजाकडून माहेरची साडी अर्पण करण्यात अाली. पद्मावती ब्रह्मोत्सवात हा साेहळा झाला. त्यात साेलापूरच्या १५ जाेडप्यांचा सहभाग हाेता. पद्मशाली पद्मावतीदेवी ब्रह्मोत्सवम संस्थेच्या वतीने त्याचे अायाेजन करण्यात अाले हाेते. संस्थेचे संस्थापक जनार्दन कारमपुरी, अध्यक्ष अंबादास बिंगी, सचिव अजय पोन्नम, खजिनदार नागेश सरगम यांच्या नेतृत्वाखाली साेलापूरहून पद्मशाली समाजातील १५ जाेडपी तिरुपतीला गेली. विधिवत पूजन करून साडी अर्पण...

आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार:ईव्हीएमच्या मुद्यावरून जयंत पाटलांची राज ठाकरेंना ऑफर

जर ईव्हीएम विषयावर मनसेला आक्षेप असेल तर आम्ही त्यांना सोबत घ्यायला तयार आहोत, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना साद घालत महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिली आहे. तसेच आता यावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष असणार आहे. जयंत पाटील म्हणाले, लोकशाही वाचविण्यासाठी जे आमच्यासोबत येतील ते येऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत इतके...

मी राजकारणातील उगवता सूर्य:अपयशाने खचणारा नाही, नीलेश लंकेंचा विखे पाटलांवर निशाणा

नीलेश लंके हा उगवता सूर्य आहे, तो खचत नाही, असे म्हणत नीलेश लंके यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीत पत्नी राणी लंके यांचा काठावर पराभव झाला. हा निश्चितच चिंतानाचा भाग आहे. मात्र येणारा काळ आपला आहे. असे खासदार नीलेश लंके म्हणाले आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघातून राणी लंके यांचा पराभव झाला. त्यसंबंधी चिंतन करण्यासाठी खासदार लंके यांनी सुप्यात कार्यकर्त्यांची...

आराध्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला अभिषेक उपस्थित होता:पार्टीचे व्हिडिओ समोर आले, जोडप्याने आयोजकांचे आभार मानले

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहेत. नुकतीच या जोडप्याची मुलगी आराध्या 13 वर्षांची झाली. या दाम्पत्याची मुलगी आराध्याचा 16 नोव्हेंबरला वाढदिवस होता. तिच्या वाढदिवशी ऐश्वर्याने आराध्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यामध्ये अभिषेक बच्चन दिसत नव्हता. अभिषेक मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत गेला नसल्याचा अंदाज लोकांच्या या फोटोंवरून बांधला जाऊ लागला होता. पण तसे नाही....

-