बांगलादेशातील जेशोरेश्वरी मंदिरातून दुर्गा मुकुट चोरीला:PM मोदींनी 3 वर्षांपूर्वी अर्पण केला होता, चोराने मुकुट पळवल्याचे CCTV फुटेज व्हायरल
बांगलादेशातील जेशोरेश्वरी मंदिरातून माँ कालीचा मुकुट चोरीला गेला आहे. हा सोन्याचा मुलामा असलेला चांदीचा मुकुट आहे. शुक्रवारी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. 2021 मध्ये बांगलादेश दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींनी जेशोरेश्वरी मंदिराला भेट दिली होती. यावेळी त्यांनी तो अर्पण केला होता. भारताने या घटनेवर आक्षेप व्यक्त केला आहे. ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांनी दोषींवर कारवाई करावी, असे म्हटले आहे. मंदिरातील...