बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करा:केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्याला निर्देश; माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीची दखल
बांगलादेश आणि म्यानमारमधून अवैध रीतीने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येणाऱ्या घुसखोरांविरोधात त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि अन्य संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. शिवसेना उपनेते माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केलेल्या मागणीची दखल घेत, केंद्रीय गृहमंत्र्यालयाने वरील निर्देश दिले...