जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभरात विशेष ग्रामसभा:ग्रामपंचायतींमध्ये होणार महत्त्वाचे ठराव, राज्य महिला आयोगाचा पुढाकार
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत 8 मार्च रोजी राज्यभरातील सर्व ग्रामपंचयातींमध्ये विशेष ग्राम सभा आयोजित करण्यात येणार आहे. या विशेष ग्राम सभेतून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संकल्पनेनुसार बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंद करणे तसेच महिला सुरक्षिततेसाठीचा ठराव या ग्रामसभांमध्ये करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या विशेष सभेची मागणी केली होती. महिला आयोगाच्या मागणीनुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा...