ईव्हीएमविरोधात राज्यात पहिले आंदोलन:अहिल्यानगरमध्ये रोहित पवार यांच्या नेतृत्वात EVM च्या प्रतिकृतीचे दहन
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशीनवर आरोप केले जात आहे. ईव्हीएम विरोधात जनआंदोलन उभारणार असल्याची भूमिका विरोधकांनी घेतली आहे. त्यातच आता ईव्हीएम विरोधातील आंदोलनाची पहिली ठिणगी अहिल्यानगरमध्ये पडली. रोहित पवार यांच्या नेतृत्वात पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. सामान्य लोकांना आता ईव्हीएमवर शंका वाटत आहे. ही शंका वाटणे लोकशाहीत योग्य नाही, असे रोहित पवार म्हणाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील...