देशासाठी एका घराने किती त्याग करायचा?:शरद पवार यांचा मोदींच्या विधानावर पलटवार, सुनील टिंगरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल
शरद पवार यांनी शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पवार म्हणाले की, सभेला येताना एका आमदाराचे मोठे बॅनर पाहिले ‘आपला आमदार, काम दमदार पण आमदार’. सुनील टिंगरे हे कुणाच्या पक्षातुन निवडून आले? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी काढला? सगळ्या हिंदुस्थानाला माहिती आहे. पक्षाच्यावतीने तुम्हाला संधी दिली, काम करावे अशी आमची अपेक्षा होती. पण तुम्ही सोडून गेले ते ठीक...