भाजपकडून शिंदे गटाला आणखी एक धक्का?:विधान परिषद सभापती पदासाठी नावावर शिक्कामोर्तब, भाजपचे राम शिंदे भरणार अर्ज
विधान परिषदेच्या सभापती पदाची 19 डिसेंबर रोजी निवड होणार आहे. विधानपरिषद सभापती पदासाठी भाजप नेते राम शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. भाजपकडून राम शिंदे बुधवारी सकाळी विधान परिषद सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भाजप राम शिंदे यांचे पुनवर्सन करणार असल्याचे दिसून येत आहे. नागपूर येथील विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच विधान परिषदेच्या सभापतीची निवड...