संतोष देशमुख हत्या प्रकरणावर विधानसभेत जोरदार चर्चा:संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडांची गुन्हेगारांना फाशीची मागणी; तर विरोधकांचाही सभात्याग
बीड जिल्ह्यातील सरपंच सतोष देशमुख हत्या प्ररकणावरुन विधिमंडळात सलग दुसऱ्या दिवशी चांगलीच खडाजंगी झाली. विरोधकांची चर्चेची मागणी फेटाळण्यात आली असली तरी आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार नमिता मुंदडा यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत हा मुद्दा मांडला. या प्रकरणातील दोषांना तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी या आमदारांनी केली आहे. तर यावरुन चर्चा करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग करत...