Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

संत सावता महाराजांच्या दारी श्रीफळ हंडी सोहळा
सोलापूर जिल्हा

संत सावता महाराजांच्या दारी श्रीफळ हंडी सोहळा

LATEST STORIES

नवीन बातम्या

49 निकाल
संत सावता महाराजांच्या दारी श्रीफळ हंडी सोहळा
सोलापूर जिल्हा

संत सावता महाराजांच्या दारी श्रीफळ हंडी सोहळा

ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि वारकऱ्यांच्या भक्तिपूर्ण उत्साहात श्रीफळ हंडी सोहळा चांगलाच रंगला.सुमारे अर्धा तास चाललेला हा नयनरम्य सोहळा उपस्थितानी याची देहा याची डोळा पाहिला. श्रीक्षेत्र अरण या ठिकाणी हजारो श्रीफळांची हंडी बांधलेली असते. गिड्डे यांच्या या मानकऱ्यांच्या घरून समारंभपूर्वक हंडी आणून पारावर बांधली गेली. पांडुरंग व सावता महाराजांच्या पालखीसमोर रंगलेल्या या दही-काल्याच्या हंडीभोवती काही श्रद्धेचे नारळ बांधले गेले. ती हंडी फोडून हा सोहळा पार पडतो. संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर कुटुंबातील बापूसाहेब देहूकर, बाळासाहेब देहूकर, देहूकर कुटुंबीयांनी श्रीफळ हंडी फोडली.

Natepute Pratinidhi
नवीन मंदिरात श्री संत दामाजीपंतांची मूर्ती प्रतिष्ठापना
सोलापूर जिल्हा

नवीन मंदिरात श्री संत दामाजीपंतांची मूर्ती प्रतिष्ठापना

श्री संत दामाजीपंत यांच्या नवीन मंदिरातील मंदिर पूजन, मूर्ती प्रतिष्ठापना व कळशारोहण सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. 15 ते 17 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक विधी, सामुदायिक संगीत भजन, ज्ञानेश्वरी हरिपाठ, कीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवेढा शहर व तालुक्यातील भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांनी केले आहे.

Natepute Pratinidhi
कुर्डुवाडी-टेंभुर्णी पुलाचे काम निकृष्ट
सोलापूर जिल्हा

कुर्डुवाडी-टेंभुर्णी पुलाचे काम निकृष्ट

कुर्डुवाडी-टेंभुर्णी रस्त्यावरील बेंद ओढ्यावर सुमारे 2 कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, असा आरोप करत नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत जाब विचारूनही, विरोध डावलून बांधकाम विभागाने ठेकेदाराला 99 लाख 4 हजार रुपयांचे बिल अदा केले. या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ​राज्य शासनाच्या नगरपरिषद नागरिक सेवा व सुविधा योजनेअंतर्गत या पुलासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी 1 कोटी 99 लाख 96 हजारांच्या रकमेला प्रशासकीय मान्यता मिळून हे काम अक्षय बागल या एजन्सीला देण्यात आले. ​नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेविका भाग्यश्री पाटील व नगरसेवक ऋषीपाल वाल्मीकी यांच्यासह इतर सदस्यांनी या कामातील गोंधळाबाबत मुख्याधिकाऱ्यांना थेट जाब विचारला होता. काम व्यवस्थित तपासून मगच निर्णय घेण्याची मागणी केली असतानाही बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी ठेकेदाराला 99,04,769 इतकी रक्कम अदा केली.

Natepute Pratinidhi
कामगार वर्गाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न
सोलापूर जिल्हा

कामगार वर्गाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

बार्शी कष्टकरी वर्गाला उद्ध्वस्त करण्यासाठी सरकार काम करत आहे. कामगार, शेतकरी, विद्यार्थी, युवक पुढील काळात संयुक्तपणे सरकारविरोधात लढाई अधिक मजबूत करतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. एआयटीयूसी कामगार केंद्र, अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संयुक्त किसान मोर्चा यांच्या वतीने सोमवारी देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, जगदाळे मामा हॉस्पिटल संघ, बांधकाम कामगार संघटना, बार्शी नगरपालिका संघटना व आरोग्य स्त्री परिचर संघटना उपस्थित होते. या वेळी कॉमेड ए. बी. कुलकर्णी, लहू आगलावे, लक्ष्मण घाडगे, आनंद गुरव, प्रवीण मस्तूद, अनिरुद्ध नखाते आदी उपस्थित होते. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Natepute Pratinidhi
शिक्षण संस्थेची झडती; सोमवारपासून तपासणी
सोलापूर जिल्हा

शिक्षण संस्थेची झडती; सोमवारपासून तपासणी

कथित भोंदूबाबा मनोहरमामा भोसले यांच्याशी आर्थिक संबंध असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भिगवण येथील एका शिक्षण संस्थेत करमाळा पोलिसांकडून सोमवारी रात्रीपासून चौकशी व कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. मात्र, पोलिसांनी अद्याप या कारवाईबाबत अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा पोलिसांचे पथक सोमवारी रात्री भिगवण जवळील शिक्षण संस्थेच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर संस्थेतील कार्यालयीन कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदी, संगणकीय माहिती तसेच अन्य संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी ही सकाळपासून रात्री उशिरा पर्यंतही पोलिसांची संस्थेतील उपस्थिती कायम होती. तसेच संस्थेशी संबंधित प्रा. राजेंद्र हुंबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

Natepute Pratinidhi
‘बाप समजून घेताना’ व्याख्यानामधून विद्यार्थ्यांना वडिलांच्या त्यागाची जाणीव
सोलापूर जिल्हा

‘बाप समजून घेताना’ व्याख्यानामधून विद्यार्थ्यांना वडिलांच्या त्यागाची जाणीव

आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून आयुष्यभर कष्ट करणाऱ्या वडिलांची किंमत मुलांनी ओळखली पाहिजे, या आशयाच्या विचारांनी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनाला स्पर्श केला. त्यांच्या भावनिक आणि प्रेरणादायी विचारांनी अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. वडिलांच्या कष्टांची जाणीव करून देणारे हे व्याख्यान विद्यार्थ्यांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेले. जवळगाव दत्तगुरु शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवळगाव नं. 2 येथे ‘बाप समजून घेताना’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांच्या ओघवत्या आणि प्रभावी वक्तृत्वाने उपस्थित विद्यार्थी भावूक झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाज मुलानी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

Natepute Pratinidhi
महिलांनी संविधानिक हक्कांची जाणीव करून घ्यावी
सोलापूर जिल्हा

महिलांनी संविधानिक हक्कांची जाणीव करून घ्यावी

संविधानाने महिलांना दिलेले अधिकार व हक्क यांची जाणीव महिलांना झाल्याशिवाय त्या सामाजिक बंधनातून पूर्णपणे मुक्त होणार नाहीत. घरातील परंपरा, कर्मकांडे, श्रद्धा, व्रत-वैकल्ये, उपवास-तापास यांसारख्या प्रथा महिलांनी स्वीकारल्या आहेत. त्यामुळे या प्रथा वर्षानुवर्षे नव्हे तर शतकानुशतके चालत आल्या आहेत. मात्र,त्यांचा चिकित्सक विचार करून महिलांनी स्वतःला या बंधनातून कधी मुक्त करणार असल्याचे प्रतिपादन अंनिसच्या संविधान जागर राज्य समन्वयक तथा मानवी हक्क व लैंगिक न्याय कार्यकर्त्या ॲड. परिक्रमा खोत यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) स्थापना दिन व क्रांती दिनानिमित्त मोहोळ शाखेच्या वतीने ‘महिलांशी सुसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच दरम्यान करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. मोहोळ अर्बन को-ऑप.बँकेच्या माजी अध्यक्षा संगिता फाटे अध्यक्षीय भाषणात संगिता फाटे यांनी उपवासाच्या प्रथेबाबत भाष्य केले.

Natepute Pratinidhi
शाळा, कॉलेजातील 300 विद्यार्थिनींनी सादर केली पारंपरिक नागपंचमीची गाणी
सोलापूर जिल्हा

शाळा, कॉलेजातील 300 विद्यार्थिनींनी सादर केली पारंपरिक नागपंचमीची गाणी

लाट्या बाई लाट्या.. चंदनी लाट्या, फू-बाई फू फुगडी फू..., काटवट कणा.., खिस बाई खिस... दोडका खिस, पिंगा गं पोरी पिंगा..., पावसाचं पाणी कवलात, पाटलाची लेक मी डौलात.., नाच गं घुमा कशी मी नाचू... अशा पारंपरिक गाण्यांवर विद्यार्थिनींच्या पावलांनी ठेका धरला. त्यानंतर उखाण्यांच्या जुगलबंदीने रत्नाई पारंपरिक नृत्य स्पर्धेत रंग भरले. अकलूज येथे संपन्न झालेल्या रत्नाई पारंपरिक नागपंचमी शालेय समूह नृत्य स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत महर्षी प्रशालेने एक लाखाचे पहिले बक्षीस पटकावले. सदाशिवराव माने विद्यालय व लक्ष्मीबाई कन्या प्रशाला आणि जिजामाता कन्या प्रशाला यांना विभागून द्वितीय क्रमांक पटकावला. तर उर्वरित तीन विद्यालयांना प्रत्येकी प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजन केले. शिक्षण प्रसारक मंडळ व प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजन केले होते. अकलूजमधील चार प्रशाला व तीन महाविद्यालयांतील सुमारे 300 विद्यार्थिनींनी पारंपरिक गाणी सादर केली. उद्घाटन सुलक्षणादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते केले.

Natepute Pratinidhi
दुरुस्तीनंतर 6 महिन्यांत बबलाद शाळेचे प्लास्टर कोसळल्याने 13 विद्यार्थी जखमी
सोलापूर जिल्हा

दुरुस्तीनंतर 6 महिन्यांत बबलाद शाळेचे प्लास्टर कोसळल्याने 13 विद्यार्थी जखमी

अक्कलकोट सहा महिन्यांपूर्वी अर्धवट दुरुस्त केलेल्या बाबलाद (ता. अक्कलकोट) येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या छताचा प्लास्टरचा काही भाग कोसळून दोन शिक्षकांसह 13 विद्यार्थी जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याबाबतची अधिक माहिती अशी, बबलाद (ता. अक्कलकोट) येथे जिल्हा परिषदेची कन्नड शाळा आहे. ही इमारत जीर्ण झाली असून, सहा महिन्यांपूर्वी तात्पुरती डागडुजी केली होती. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढली होती. नंतर ते विद्यार्थी शाळेत आले आणि शाळेतील व्हरांड्यात थांबून 15 ऑगस्टच्या ध्वजवंदन कार्यक्रमाची तयारी करत होते.

Natepute Pratinidhi
टीईटी पेपरफुटीचे सोलापूर कनेक्शन
सोलापूर जिल्हा

टीईटी पेपरफुटीचे सोलापूर कनेक्शन

‘टीईटी’ पेपर फुटी प्रकरणाचे कनेक्शन आता सोलापूरपर्यंत आल्याचे उघड झाले आहे. भिवंडी पोलिसांनी आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे. त्यापैकी काहींच्या जबाबातून सोलापूरमधील पोलिस भरती पूर्वप्रशिक्षण केंद्राचा चालक प्रकाश पवार (रा. सोरेगाव) याचाही रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पवारला अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधारांना परीक्षार्थींची कागदपत्रे पुरवल्याचा त्याच्यावर ठपका आहे. न्यायालयाने त्याला 15 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. त्याच्याकडे 26 विद्यार्थ्यांचे पेपर सापडले, त्यामध्ये 20 उत्तीर्ण झालेल्यांचे पेपर आढळून आले. त्यापैकी 5 पेपर टीईटी उत्तीर्ण झालेल्यांचे असल्याचा संशय आहे. रॅकेटचे नेटवर्क तीन- चार राज्यांत पोलिस पाळेमुळे खोदण्यात व्यग्र 28 जून रोजी महाराष्ट्रात टीईटीची परीक्षा होणार होती. मात्र त्यापूर्वीच ठाणे, भिवंडीत 27 जून रोजीच हा पेपर फुटला. त्यामुळे परीक्षाच रद्द करण्यात आली, ती अजून झाली नाही. उमेदवार त्याची वाट पहात आहेत.

Natepute Pratinidhi
मराठ्यांना फक्त प्रचारासाठी वापरायचे का?:मनोज जरांगेंचा इशारा
सोलापूर जिल्हा

मराठ्यांना फक्त प्रचारासाठी वापरायचे का?:मनोज जरांगेंचा इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका कायम ठेवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीनंतर आता ते सातारा जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. आज मायणी, मसूर आणि पाचवड येथे त्यांच्या बैठका आणि सभा होणार असून, उद्या पाटणमध्ये जाहीर सभा आणि साताऱ्यात पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारही सक्रिय झाले आहे. मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक होणार आहे. या दौऱ्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत सरकारने झालेली चूक मान्य करून ती दुरुस्त करावी, अशी मागणी केली आहे. मराठा आरक्षणाशी संबंधित निर्णय, प्रमाणपत्रे आणि प्रलंबित मागण्यांवरून त्यांनी सरकार तसेच अधिकाऱ्यांना सुनावले.

Natepute Pratinidhi
शरद पवार गटाची मोठी राजकीय खेळी
सोलापूर जिल्हा

शरद पवार गटाची मोठी राजकीय खेळी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार येत्या सोमवारी राजधानी दिल्लीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली ही उच्चस्तरीय भेट होणार असून, संसदेत सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे. राज्यातील विविध भागांत निर्माण झालेली गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांसमोरील तीव्र अडचणी आणि केंद्र सरकारकडून मिळणारी मदत या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची ओढ आणि पाण्याचा गंभीर तुटवडा यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा