राज्यात शिवशाहीचा प्रवास सुरूच राहणार
सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील राज्यात धावणार्या 792 शिवशाही वातानुकूलीत बसेस या सुरूच राहतील. या बसमध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच या बस बंद करण्याचा महामंडळाचा कोणताही विचार नाही, असा निर्णय एसटी महामंडळाने घेतल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
दरम्यान, गत दोन दिवसांपूर्वी गोंदियामध्ये शिवशाही बसच्या झालेल्या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे राज्यातील शिवशाही बस बंद होणार, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या. यामुळे शिवशाहीसंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने महामंडळाकडून यावर खुलासा देण्यात आला.
दरम्यान, एसटी महामंडळात वातानुकूलीत 792 शिवशाही सध्या राज्यातील विविध आगारांतून धावतात. शिवशाही बसच्या अंतर्गत व बाह्यरचनेत कोणताही बदल केला जाणार नाही. तसचे या बसचे लालपरीमध्येही रूपांतर केले जाणार नाही. शिवशाही बसमध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. म्हणून या बस बंद करण्याचा महामंडळाचा विचार नाही. त्यामुळे एसटीने प्रवास करणार्या प्रवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
राज्यातील विविध आगारांमध्ये एसटी महामंडळाकडे सध्या 792 शिवशाही वातानुकूलीत बस आहेत. या बसमध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच महामंडळाकडून या बस बंद करण्याचा कोणताही विचार नाही. तरी कोणत्याही अफवांवर नागरिक आणि प्रवाशांनी विश्वास ठेवू नये.