दिलीप वळसे पाटलांना मंत्रिपद का नाही?:नवीन नेतृत्व महाराष्ट्रात तयार करायचे आहे, सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितले
महाराष्ट्रात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. मात्र, अनेक आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे देखील समोर आले आहे. तसेच अजित पवारांनी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपद का दिले नाही म्हणून अनेकांना प्रश्न पडला होता. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना तटकरे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली...