Category: मराठी न्यूज

Marathi News

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल:फडणवीसांचा दावा; आकडेवारीही मांडली; शिंदे, अजितदादांचे नाव घेत घौडदौड कायम राहण्याची ग्वाही

परकीय गुंतवणूक म्हणजेच एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र पुन्हा एकदा अग्रेसर ठरला आहे. 2024- 25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र अव्वल असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. इतकेच नाही तरी यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे नाव घेत राज्याचे अभिनंदन देखील केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र...

वाल्मीक कराडची ‘ती’ मागणी न्यायालयाने फेटाळली:पोलिस कोठडीत हवा होता 24 तास मदतीस; ‘स्लीप ॲप्निया’ नावाचा आजार झाल्याचा दावा

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याने न्यायालयात आपल्याला 24 तास मदतीस मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. यामध्ये आपल्याला स्लीप ॲप्निया या नावाचा आजार असल्याचे त्याने म्हटले होते. या आजारात रुग्णाला रोज रात्री ऑक्सिजन सारखी एक मशीन लावली जाते. मात्र ही मशीन ऑक्सिजन नसून रुग्णाला झोप येण्यासाठी लावली जाते. ही मशीन लावण्यासाठी आणि इतर कामासाठी...

दलित आणि ब्राम्हणच जातीयवादाचे खरे बळी:प्रा. मच्छिंद्र सकटे यांचा दावा; तर सकटे RSS चे ‘स्लीपर सेल’ असल्याचा प्रक्षाळे यांचा आरोप

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रा. स्व. संघाच्या कराड शाखेला दिलेल्या भेटीवेळी ‘संघाच्या बाबतीत मतभेद असले तरी संघाकडे आपलेपणाने पाहावं’, असं म्हटल्याचा दावा करून आरएसएस प्रणित लोककल्याण मंडळ ट्रस्ट च्या वतीनं कराडमध्ये गुरूवारी संध्याकाळी बंधुता परिषद घेण्यात आली. त्यावेळी बोलताना ‘दलित आणि ब्राम्हणच जातीयवादाचे खरे बळी’ असल्याचं वक्तव्य दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी केलं. त्यांच्या विधानावरून आंबेडकरवाद्यांमध्ये जोरदार प्रतिक्रिया उमटू...

ठाकरे गटाकडून फडणवीसांच्या कामाचे कौतुक:मात्र, ‘हा विडा गरीब आदिवासी यांच्यासाठीच हे दाखवून देण्याची काळजी घ्यावी’

‘नक्षलवाद्यांचा जिल्हा’ याऐवजी गडचिरोलीला ‘पोलाद सिटी’ ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा, यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत. ते चुकीचे नाही. फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा ‘विडा’ आपण तेथील सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठीच उचलला आहे, कोणा खाणसम्राटांसाठी नाही, हे दाखवून देण्याची काळजी...

दिव्य मराठी अपडेट्स:मुंबईहुन सोलापूरकडे येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर जेऊर जवळ अज्ञातांकडून दगडफेक

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स मुंबईहुन सोलापूरकडे येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक सोलापूर- मुंबईहुन सोलापूरकडे येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील जेऊर जवळ रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. दगडफेकीत वंदे भारत एक्सप्रेस सी – 11डब्यातील काच फुटली असल्याचे सांगण्यात आले. सुदैवानं कोणत्याही...

मुंबईत पुन्हा मराठी हिंदी वाद:मराठीत बोलायला सांगणाऱ्या तरुणालाच माफी मागायला लावली, त्याच्यावर गुन्हाही दाखल

मुंबईमध्ये मराठी भाषेला तसेच मराठी भाषकांना सातत्याने विरोध होत असल्याच्या घटना घडताना दिसत आहेत. ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा येथे एका मराठी तरुणाला जमलेल्या जमावाने दमदाटी करत माफी मागायला लावली असल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाने केवळ फळविक्रेत्याला मराठीमध्ये बोलण्यास सांगितले असल्याचे त्याने व्हिडिओमध्ये सांगितले आहे. मुंब्रा येथे फळविक्रेत्याला मराठी का येत नाही विचारले म्हणून जमावाने एका मराठी तरुणाला माफी मागायला...

बाहेरचे लोक थेट वाल्मीक कराडच्या कोठडीपर्यंत जातात:माझ्यावर पोलिस ठाण्यात आरेरावी केली, धनंजय देशमुख यांचे पोलिस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

बीड सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. या संदर्भात त्यांनी पोलिस आधीक्षकांना पत्र देखील पाठवले आहे. या पत्रातून त्यांनी तक्रार मांडल्या आहेत. पोलिस ठाण्यात त्यांना पोलिसांकडून आरेरावी केली जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. तसेच बाहेरील लोक थेट वाल्मीक कराड असलेल्या कोठडीपर्यंत जात असून कराडला सुविधा मिळत असल्याचा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला...

केज येथील आणखी एका माजी सरपंचाचे अपहरण:मित्रानेच ठेवले होते डांबून, एकमेकांविरोधात तक्रार दाखल

मस्साजोग येथील सरपंच खून प्रकरण ताजे असतानाच त्याच केज तालुक्यातील कळंम आंबा येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर इंगळे यांचे त्यांचाच मित्र असलेल्या कार्य गाव सामाजिक सरपंच दत्ता तांदळे याने अपहरण करून पाटोदा येथील एका खोलीत डांबल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर ज्ञानेश्वर यांनी थेट एसपी ऑफिस गाठत या संदर्भात आपली कैफियत मांडली, तर दुसरीकडे दत्ता तांदळे याने देखील ज्ञानेश्वर यांच्या...

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण:एसआयटीने बैठक घेत नातेवाईकांसह लोकांचीही केली चौकशी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात शासनाने सीआयडीचे आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. गुरुवारी दुपारी १.३० वाजता केज येथील शासकीय विश्रामगृहावर तेली यांनी पथकातील अधिकारी – कर्मचाऱ्यांची बैठक घेत प्रकरणाविषयी सर्व माहिती जाणून घेत नातेवाईकांसह काही लोकांचीही चौकशी केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटनेला २२...

नागपूरच्या गँगवॉरमध्ये एकाचा मृत्यू:कार आडवत केला देशी कट्ट्याने गोळीबार, भावाच्या हत्येचा बदला घेतल्याचा संशय

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. बीडची घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्ये गोळीबार झाला असून यात एकाचा मृत्यू देखील झाला आहे. पवन हिरण्वार असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेचा आता पोलिस तपास करत आहेत. मृत्यू झालेला तरुण व हल्लेखोर नागपूरमधलेच असल्याची प्राथमिक माहिती आहे. हा गँगवॉर असल्याचे बोलले जात आहे. या गोळीबारात पवन हिरण्वार...

-