Category: मराठी न्यूज

Marathi News

भाजपचे जुने प्लॅन अंमलात आणण्यासाठी बाबासाहेब अडसर:शहांच्या वक्तव्यातून जुनी मानिकता बाहेर पडली, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला घेरले आहे. त्यांनी संघ, भाजप अन् अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. भाजप आणि संघाचे जे काही जुने प्लॅन आहेत ते आता अंमलात आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर अडकर आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या विधानामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून...

सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर:तर्कतीर्थ, मर्ढेकरांना मिळलेला सर्वोच्च पुरस्कार मिळाला म्हणत रसाळांनी व्यक्त केला आनंद!

साहित्य अकादमीच्या वतीने दिला जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये मराठी भाषेतील प्रसिद्ध लेखक सुधीर रसाळ यांचा नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे. ‘विंदांचे गद्यरूप’ या सुधीर रसाळ यांनी लिहिलेल्या पुस्तकाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर्थतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, बा. सी. मर्ढेकर यांना मिळालेला सर्वोच्च पुरस्कार मला मिळाला म्हणत सुधीर रसाळ यांनी दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना आनंद व्यक्त...

नरेंद्र मोदींना तात्काळ सत्ता सोडावी:आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे आक्रमक; भाजपचा बुरखा फाटल्याचा दावा

भारतीय जनता पक्षाचे नेते कायम महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करतात. तो अपमान आता सहनशीलतेच्या पुढे गेला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उर्मटपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला आहे. असा आरोप ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी तात्काळ सत्ता सोडावी अशी मागणी ठाकरे यांनी केली. इतकेच नाही तर अमित...

संजय राऊतांचे मन:स्वास्थ्य बिघडले:सुनील तटकरे यांचा पलटवार; नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांची भेट घेणार असल्याचाही दावा

छगन भुजबळ यांच्या ज्येष्ठत्वाबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. त्यांचे मत व्यक्त करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. गेल्या दोन दिवसापासून समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्याशी माझी चर्चा सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. आपण शक्य तेवढ्या लवकर त्यांची भेट घेणार असल्याचेही तटकरे यांनी म्हटले आहे. येत्या एक ते दोन दिवसात या सर्व गोष्टीवर पडदा पडेल,...

शिंदे गटात निष्ठा दिसत नाही:आमदारांच्या नाराजीवरून संजय राऊत यांचा निशाणा; ठाकरे-फडणवीसांच्या भेटीत खळबळ काय? माध्यमांनाच प्रतिप्रश्न

ज्यांना मंत्रिपदे मिळाले नाही त्यांच्याकडे निष्ठा वगैरे काही दिसत नाही. काही लोक बॅगा भरून नागपुरातून निघून गेले आहेत. शिवसेना पक्षामध्ये असे कधीही झाले नाही. आमच्या पक्षात असे चालत नाही, असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असेल तर त्यात खळबळ माजण्यासारखे काही नाही, असे देखील...

शरद पवार गटाचे आमदार अजित पवार यांच्या भेटीला:दादांची प्रकृती खराब, पण ते राजकीय आजारी नाहीत; शशिकांत शिंदे यांचा दावा

मुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती ठीक नव्हती. मात्र त्यांना राजकीय आजार नव्हता, असे दिसत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. शशिकांत शिंदे यांनी आज अजित पवार यांची यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, आमची केवळ सदिच्छा भेट होती. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटलो असल्याचे...

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस:अजित पवार विधिमंडळ कामकाजात सहभागी होण्याची शक्यता

राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती खराब असल्याने ते आजपर्यंत अधिवेशनात दिसले नाहीत. तर ते आज सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच नागपूर मध्ये असलेल्या प्रचंड थंडीमुळे अनेक नेत्यांची प्रकृती खराब झाल्याचे सांगण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची देखील प्रकृती खराब असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

फडणवीस यांचे लाडक्या बहिणींवरचे प्रेम म्हणजे ढोंग:अश्रू पुसण्यासाठी सरकारने महामंडळ स्थापन करायला हरकत नाही; ठाकरे गटाचा निशाणा

राज्यातील नव्या सरकारचे मंत्रिमंडळ अखेर बनले, पण रडारड संपलेली नाही. नाराज मंडळींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी नव्या सरकारने एखादे महामंडळ स्थापन करायला हरकत नाही. कोणी कितीही आपटली व अश्रू ढाळले तरी ईव्हीएम बहुमताच्या जोरावर सरकार मजबूत आहे. त्यामुळे नवीन मंत्री सध्या बिनखात्याचे असले तरी कारभार रेटून नेला जाईल. भविष्यात शिंदे व अजित पवार निस्तेज होतील आणि काही आदळआपट करायचा प्रयत्न केला...

दिव्य मराठी अपडेट्स:आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया आजपासून; तर पुण्यात आजपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स पुण्यात आजपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पुणे – सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 18 डिसेंबरपासून पुण्यात सुरू होत आहे. दुपारी 3 वाजता या स्वरयज्ञाला प्रारंभ होईल. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडा संकुलात 18 ते 22 डिसेंबरदरम्यान हा 70 वा महोत्सव होणार आहे. कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी...

भाजपकडून शिंदे गटाला आणखी एक धक्का?:विधान परिषद सभापती पदासाठी नावावर शिक्कामोर्तब, भाजपचे राम शिंदे भरणार अर्ज

विधान परिषदेच्या सभापती पदाची 19 डिसेंबर रोजी निवड होणार आहे. विधानपरिषद सभापती पदासाठी भाजप नेते राम शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. भाजपकडून राम शिंदे बुधवारी सकाळी विधान परिषद सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भाजप राम शिंदे यांचे पुनवर्सन करणार असल्याचे दिसून येत आहे. नागपूर येथील विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच विधान परिषदेच्या सभापतीची निवड...

-