Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

फलकाअभावी सावळेश्वर, कोळेगावजवळ अपघात
सोलापूर जिल्हा

फलकाअभावी सावळेश्वर, कोळेगावजवळ अपघात

LATEST STORIES

नवीन बातम्या

76 निकाल
फलकाअभावी सावळेश्वर, कोळेगावजवळ अपघात
सोलापूर जिल्हा

फलकाअभावी सावळेश्वर, कोळेगावजवळ अपघात

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर तसेच कोळेगाव परिसरात पूल बांधणी आणि रस्ता रूंदीकरणाचे काम चालू आहे. तेथे बॅरिकेड, दिशादर्शक फलक न लावल्यामुळे वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने सावळेश्वर व कोळेगावजवळ कार व ट्रक उलटली. यामध्ये चौघे जण बचावले. याबाबतची अधिक माहिती अशी, ठाकरे सेनेचे कोळेगाव विभागप्रमुख सागर गायकवाड हे कारने (एमएच 14 डीएक्स 0041) मोहोळकडे जात होते. सकाळी 9.30 वाजता मोहोळ तालुक्यातील कोळेगांव जवळ येताच तिथे मोठा खोदलेला रस्ता दिसला तिथे बॅरिकेड नव्हते, रस्ता बाजूने खोदला असून, रुंदीकरणाचे काम चालू आहे, असा फलक नाही. खड्डा पाहून चालकाने अचानक ब्रेक मारल्याने गाडी तीन वेळा उलटली. त्यात ते व त्यांचे सहकारी किरकोळ जखमी झाले.

Natepute Pratinidhi
दुष्काळाचा फटका; पंढरपुरात चाऱ्याची आवक घटली
सोलापूर जिल्हा

दुष्काळाचा फटका; पंढरपुरात चाऱ्याची आवक घटली

दुष्काळी परिस्थितीचा फटका आता जनावरांच्या चारा उपलब्धतेलाही बसू लागला आहे. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोजची चाऱ्याची आवक घटली असून, दुसरीकडे चाऱ्याच्या दरात 30 ते 40 टक्के पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करताना पशुपालकांना आर्थिक कसरत करावी लागत आहे. यंदा पावसाअभावी पंढरपूर तालुक्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाली आहे.खरिपाची कसलीच पेरणी झालेली नाही, त्यामुळे मका, बाजरी आणि इतर खरीप पिकांचा चारा उपलब्ध झालेला नाही. तर शेतातील मका, कडवळ, आणि ऊस अशा चारा पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याने बाजारात येणाऱ्या चाऱ्याचे प्रमाणही घटले आहे.

Natepute Pratinidhi
मंगळवेढ्यात नैसर्गिक जलस्रोतावरील अतिक्रमणामुळे टँकर सुरू करण्याची वेळ
सोलापूर जिल्हा

मंगळवेढ्यात नैसर्गिक जलस्रोतावरील अतिक्रमणामुळे टँकर सुरू करण्याची वेळ

उच्च न्यायालयाचे नैसर्गिक जलस्रोत अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिलेले असताना त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी साठवणूक न झाल्याने अशी परिस्थिती उद्भवली आहे. गावोगावी टँकर सुरू करावे लागत आहेत. मूळ नैसर्गिक जलस्रोत खुले केले असते तर टँकर सुरू करण्याची आवश्यकता भासली नसती. सद्य परिस्थितीत तालुक्यातील 82 गावांपैकी 66 गावांत नैसर्गिक जलस्त्रोत आहेत. मात्र त्यावर अतिक्रमण झाल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावोगावी स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरींवरही अतिक्रमण झाले असल्यामुळे यावर शासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी जनतेतून मागणी होत आहे.

Natepute Pratinidhi
ललित पंचमीनिमित्त राज्यभरात एकाच वेळी होणार सामूहिक नामस्मरण सोहळा
सोलापूर जिल्हा

ललित पंचमीनिमित्त राज्यभरात एकाच वेळी होणार सामूहिक नामस्मरण सोहळा

अक्कलकोट स्टेशन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट आगमन दिनानिमित्त ललित पंचमीला राज्यभर एकाच वेळी सामूहिक नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अक्कलकोट येथील समर्थ नगरी परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबवण्यात येणार असून, महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि अमेरिकेतही स्वामीभक्त एकत्रित नामस्मरण करणार आहेत. सर्व स्वामीभक्तांनी आपल्या गावात एकत्र येऊन या सोहळ्यात सहभागी व्हावे आणि स्वामीचरणी सेवा अर्पण करावी, असे आवाहन समर्थ नगरी अध्यात्मिक समितीच्या अध्यक्षा सुखदा ग्रामोपाध्ये यांनी केले आहे.

Natepute Pratinidhi
सरकारमहर्षी कारखान्याला उच्च साखर उताऱ्याचा पुरस्कार
सोलापूर जिल्हा

सरकारमहर्षी कारखान्याला उच्च साखर उताऱ्याचा पुरस्कार

सहकारमहर्षी साखर कारखान्याने गतवर्षीच्या हंगामात ऊस विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली या संस्थेने ऊस विकासाकरिता उच्च साखर उतारा विभागातून सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना राष्ट्रीय कार्यक्षमता तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी, राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, गुजरातचे सहकार मंत्री गुरजर, हरियाणाचे मंत्री डॉ.अरविंद कुमार शर्मा, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक जयप्रकाश नाईकनवरे व इतर मान्यवरांच्या हस्ते कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी व संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला.

Natepute Pratinidhi
व्यवस्थेचे बोललो असेल ते विसरून जा, करमाळ्याच्या विकासाचे लक्षात आहे
सोलापूर जिल्हा

व्यवस्थेचे बोललो असेल ते विसरून जा, करमाळ्याच्या विकासाचे लक्षात आहे

निवडणुकीच्या काळात विकासकामांच्या बाबतीत जे बोललो ते सत्य आहे. इतर काही गोष्टी व्यवस्था म्हणून बोललो असेल तर त्या विसरून जा. मात्र करमाळा शहराच्या विकासाबाबत बोललेल्या गोष्टींचा मला कधीही विसर पडणार नाही. असे त्यांनी सांगितले. करमाळा शहरातील भवानी नाका येथील छत्रपती चौकात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा व स्मारकाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 21) करण्यात आले.

Natepute Pratinidhi
अन्न भेसळ, मेडिकल आणि डेअरींवर तुकाराम मुंडेंचा ‘छापा’
सोलापूर जिल्हा

अन्न भेसळ, मेडिकल आणि डेअरींवर तुकाराम मुंडेंचा ‘छापा’

अन्नभेसळीचे वाढते प्रमाण, दूध संकलन केंद्रांवर दुधात पाणी अथवा अन्य पदार्थांची भेसळ, तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयांवर या सजीव देखाव्यातून जनजागृती केली आहे. दूध, खाद्यपदार्थ तसेच विविध वस्तू खरेदी करताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याचे प्रबोधनही देखाव्यातून करण्यात आले आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. या देखाव्यात अन्नभेसळ अधिकाऱ्यांच्या कारवाईचे विविध प्रसंग सादर करण्यात आले आहेत. अन्नभेसळ अधिकारी तुकाराम मुंडे यांची भूमिका नयन लोखंडे यांनी साकारली आहे. दूध संकलन केंद्राच्या मालकाची भूमिका युवराज गाडे, फार्मा कंपनी चालकाची भूमिका कौस्तुभ भोसेकर, तर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भोजन बनवणाऱ्या मामाची भूमिका रूपेश कसबे यांनी केली आहे.

Natepute Pratinidhi
सामाजिक उपक्रमाबरोबरच वृक्षारोपणास गती द्यावी
सोलापूर जिल्हा

सामाजिक उपक्रमाबरोबरच वृक्षारोपणास गती द्यावी

प्रत्येक गणेश मंडळांनी समाजोपयोगी कार्यक्रम राबवावेत. तसेच प्रत्येकांनी एक झाड लावून वृक्षारोपण उपक्रमास हातभार लावावा, असे आवाहन करकंब पोलीस स्टेशनचे श्याम गायकवाड यांनी केले. करकंब येथील आंबे मळा वस्तीवरील विघ्नहर्ता प्रतिष्ठानने गणेश उत्सवा निमित्ताने इयत्ता पहिली ते बारावी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, हस्ताक्षर व वकृत्व या स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धा अमोल पब्लिक स्कूल मध्ये घेण्यात आल्या.

Natepute Pratinidhi
करमाळ्यात महिला सुरक्षा अन् कायद्याबाबत पथनाट्यातून जागर
सोलापूर जिल्हा

करमाळ्यात महिला सुरक्षा अन् कायद्याबाबत पथनाट्यातून जागर

महिला व मुलींनी संकटाच्या प्रसंगी कोणती काळजी घ्यावी, छेडछाड व महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क कसा साधावा, यासाठीचे असणारे हेल्पलाइन नंबर देण्यात आले. तसेच उपलब्ध कायदेशीर मदत व सुरक्षा यंत्रणांचा वापर कसा करावा, महिला व मुलींनी भीती न बाळगता अन्याया विरोधात आवाज उठवावा, संशयास्पद अथवा त्रासदायक प्रकारांची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असा संदेश पथनाट्यातून देण्यात आला. महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने करमाळा निर्भया पथक व करमाळाचा राजा गणेशोत्सव मंडळ, राशीन पेठ, करमाळा यांच्या विद्यमाने करमाळा शहरातील विविध ठिकाणी निर्भया पथक या विषयावर प्रभावी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.

Natepute Pratinidhi
झळ:गतवर्षी पूर; यंदा सीनाकाठच्या ऊस शेतीची होरपळ
सोलापूर जिल्हा

झळ:गतवर्षी पूर; यंदा सीनाकाठच्या ऊस शेतीची होरपळ

गतवर्षी सीना नदीला आलेल्या महापुराचे पाणी 11 दिवस शेतात राहिल्याने हातातोंडाशी आलेला घास पुराने हिरावून घेतला. यंदा पर्जन्यवृष्टी कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनीच्या पाण्याने सिना नदी भरली असली तरी शेतीला पुरेशी वीजच मिळत नसल्याने पाण्याअभावी पिके जळू लागल्याने दर आठवड्याला एक एकर ऊस सोडून देण्याची वेळ आल्याची व्यथा सीनाकाठी असलेल्या खैराव येथील शेतकरी कृष्णात गोवर्धन नागटिळक यांनी मांडली. माढा तालुक्यातील खैराव येथील शेतकरी असलेल्या नागटिळक यांना 18 एकर जमीन असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. गेल्या वर्षी सीना नदीला महापूर आल्याने अकरा दिवस पुराचे पाणी शेतात राहिले. यंदा झालेल्या नुकसानीची कसर निघेल या भाबड्या आशेने एकरी 40 हजार रुपये खर्च करून ऑक्टोबर महिन्यात 9 एकर ऊस, 4 एकर वैरण आणि दोन एकर कडवळाची लागवड केली. त्यासाठी 5 लाखांवर खर्च केला. परंतु पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली.

Natepute Pratinidhi
मंगळवेढ्यात 59 वर्षांपासून सामाज प्रबोधनाचे नवरंग
सोलापूर जिल्हा

मंगळवेढ्यात 59 वर्षांपासून सामाज प्रबोधनाचे नवरंग

संत नगरी मंगळवेढा शहरातील पहिले गणेशोत्सव मंडळ म्हणून परिचित असणारे सामाजिक उपक्रम राबवून नावलौकिक मिळवलेले गणेशोत्सव मंडळ म्हणजे नवरंग युवक गणेशोत्सव मंडळ होय. या मंडळाची स्थापना सन 1968 मध्ये झाली. मंडळाचे एकोणसाठावे वर्ष आहे, त्यावेळेचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै गौरीशंकर वठारे हे होते, सदर मंडळाचे समितीमध्ये स्वर्गीय बंडा मोडक, दामोदर दत्तू, चंद्रकांत किल्लेदार, निवृत्ती डोरले, सुकदेव जावळे, रामचंद्र चेळेकर, भाऊ चेळेकर, धोंडीराम राऊत, डॉ. बी. पी. देशमुख, बाबू लेंडवे, चंद्रकांत वेदपाठक पेंटर, लक्ष्मण चेळेकर, राजेंद्र भगरे हे होते व मंडळाचे मार्गदर्शक म्हणून आण्णाराव चेळेकर होते. यातील अनेक जण हयात नाहीत मात्र त्यांचे विचार व प्रेरणा घेऊन हे मंडळ सामाजिक उपक्रम राबवत आहे. या मंडळाने स्थापनेपासून अंदाजे तीन ते चार वेळा रक्तदान शिबिर घेतले होते, यामध्ये जवळपास 500 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

Natepute Pratinidhi
पाण्यासाठी तुळशी ग्रामस्थांचा थाळीनाद
सोलापूर जिल्हा

पाण्यासाठी तुळशी ग्रामस्थांचा थाळीनाद

माढा गेल्या पंचवीस वर्षांपासून अनेक आंदोलने करूनही सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कायमस्वरूपी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या तुळशी गावकऱ्यांनी "आमचे गाव विक्रीस काढले आहे, कोणीतरी विकत घ्या" अशी आर्त हाक देत उजनी पाणी संघर्ष समितीच्या वतीने माढा तहसील कार्यालयावर थाळीनाद आंदोलन केले. सन 2000 पासून सिना-माढा उपसा जलसिंचन योजना कार्यरत आहे. अनेक वर्षांपासून तुळशी गावाचा या योजनेत समावेश नव्हता. अनेक निवेदने व आंदोलनानंतर गावाचा समावेश झाला, मात्र समावेश होऊनही अद्याप पाणी आलेले नाही. यंदा पर्जन्यवृष्टी कमी झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचे गंभीर हाल होत आहेत.

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा