Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी
सोलापूर जिल्हा

श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी

LATEST STORIES

नवीन बातम्या

76 निकाल
श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी
सोलापूर जिल्हा

श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी

श्रावणमासानिमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात यंदाही विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणातील चारही सप्ताहांत भागवत कथा, गीता पठण, कीर्तन, हरीपाठ व रामकथा यांसह विविध भक्तिमय कार्यक्रम होणार असून भाविकांना या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे. श्रावणमासाच्या पहिल्या सप्ताहात ह.भ.प. श्रीहरी महाराज रसाळ (अंबड, जि. जालना) यांच्या वाणीतून भागवत कथा सप्ताह होणार आहे. दुसऱ्या सप्ताहात ह.भ.प. मनोहर महाराज घोरपडे (महालिंगरायवाडी, धाराशिव) यांचे गीता पठण होईल.

Natepute Pratinidhi
बबलाद शाळा दुर्घटनेवरून झेडपी सभेत खडाजंगी:‘शिवरत्न’ नाव बदलास मंजुरी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर अडीच तास चर्चा, प्रशासनाचा अहवाल अमान्य‎
सोलापूर जिल्हा

बबलाद शाळा दुर्घटनेवरून झेडपी सभेत खडाजंगी:‘शिवरत्न’ नाव बदलास मंजुरी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर अडीच तास चर्चा, प्रशासनाचा अहवाल अमान्य‎

सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या सभेत अक्कलकोट तालुक्यातील बबलाद शाळेच्या दुर्घटनेवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. याच सभेत ‘शिवरत्न' सभागृहाचे नाव बदलून“अटलबिहारी वाजपेयी सभागृह' करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. यावेळी सभागृहात राजकीय विरोधकांचे दुर्मिळ ऐक्यही पाहायला मिळाले. बबलाद येथील शाळेचे छत कोसळून विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलेल्या दुर्घटनेवर सभेत तब्बल अडीच तास चर्चा झाली. साडीचा झोका बांधल्यामुळे हा अपघात झाल्याचा गटशिक्षण अधिकाऱ्यांचा अहवाल चुकीचा असल्याचा दावा करत शिवराज म्हेत्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि प्रशासनाला जाब विचारला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी तो अहवाल अधिकाऱ्यांनी दिला असल्याचे सांगितले.

Natepute Pratinidhi
पुढचं आंदोलन थेट वर्षावर, पाण्याच्या टाकीवरच बसणार
सोलापूर जिल्हा

पुढचं आंदोलन थेट वर्षावर, पाण्याच्या टाकीवरच बसणार

"येत्या 29 ऑगस्टला एकाही मराठ्याने घरी राहायचे नाही. मराठे मोठ्या संख्येने मुंबईला येण्याची दाट शक्यता आहे. मुंबईला जाऊन मला बऱ्याच गोष्टी पाहायच्या आहेत... शेअर मार्केटचा बैल पाहायचा आहे, विमान कसं उडतं ते पाहायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांचं 'वर्षा' निवासस्थान कसं आहे, तेही बघायचं आहे. मला तर वाटतंय की आता 'वर्षा'वरच उपोषणाला बसलेलं बरं राहील. तिथे फडणवीसांनी जी पाण्याची टाकी ठेवली आहे, त्याच पाण्याच्या टाकीवर मी उपोषणाला बसणार आहे," असा थेट आणि आक्रमक इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Natepute Pratinidhi
संत सावता महाराजांच्या दारी श्रीफळ हंडी सोहळा
सोलापूर जिल्हा

संत सावता महाराजांच्या दारी श्रीफळ हंडी सोहळा

ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि वारकऱ्यांच्या भक्तिपूर्ण उत्साहात श्रीफळ हंडी सोहळा चांगलाच रंगला.सुमारे अर्धा तास चाललेला हा नयनरम्य सोहळा उपस्थितानी याची देहा याची डोळा पाहिला. श्रीक्षेत्र अरण या ठिकाणी हजारो श्रीफळांची हंडी बांधलेली असते. गिड्डे यांच्या या मानकऱ्यांच्या घरून समारंभपूर्वक हंडी आणून पारावर बांधली गेली. पांडुरंग व सावता महाराजांच्या पालखीसमोर रंगलेल्या या दही-काल्याच्या हंडीभोवती काही श्रद्धेचे नारळ बांधले गेले. ती हंडी फोडून हा सोहळा पार पडतो. संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर कुटुंबातील बापूसाहेब देहूकर, बाळासाहेब देहूकर, देहूकर कुटुंबीयांनी श्रीफळ हंडी फोडली.

Natepute Pratinidhi
नवीन मंदिरात श्री संत दामाजीपंतांची मूर्ती प्रतिष्ठापना
सोलापूर जिल्हा

नवीन मंदिरात श्री संत दामाजीपंतांची मूर्ती प्रतिष्ठापना

श्री संत दामाजीपंत यांच्या नवीन मंदिरातील मंदिर पूजन, मूर्ती प्रतिष्ठापना व कळशारोहण सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. 15 ते 17 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक विधी, सामुदायिक संगीत भजन, ज्ञानेश्वरी हरिपाठ, कीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवेढा शहर व तालुक्यातील भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांनी केले आहे.

Natepute Pratinidhi
कुर्डुवाडी-टेंभुर्णी पुलाचे काम निकृष्ट
सोलापूर जिल्हा

कुर्डुवाडी-टेंभुर्णी पुलाचे काम निकृष्ट

कुर्डुवाडी-टेंभुर्णी रस्त्यावरील बेंद ओढ्यावर सुमारे 2 कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, असा आरोप करत नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत जाब विचारूनही, विरोध डावलून बांधकाम विभागाने ठेकेदाराला 99 लाख 4 हजार रुपयांचे बिल अदा केले. या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ​राज्य शासनाच्या नगरपरिषद नागरिक सेवा व सुविधा योजनेअंतर्गत या पुलासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी 1 कोटी 99 लाख 96 हजारांच्या रकमेला प्रशासकीय मान्यता मिळून हे काम अक्षय बागल या एजन्सीला देण्यात आले. ​नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेविका भाग्यश्री पाटील व नगरसेवक ऋषीपाल वाल्मीकी यांच्यासह इतर सदस्यांनी या कामातील गोंधळाबाबत मुख्याधिकाऱ्यांना थेट जाब विचारला होता. काम व्यवस्थित तपासून मगच निर्णय घेण्याची मागणी केली असतानाही बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी ठेकेदाराला 99,04,769 इतकी रक्कम अदा केली.

Natepute Pratinidhi
कामगार वर्गाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न
सोलापूर जिल्हा

कामगार वर्गाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

बार्शी कष्टकरी वर्गाला उद्ध्वस्त करण्यासाठी सरकार काम करत आहे. कामगार, शेतकरी, विद्यार्थी, युवक पुढील काळात संयुक्तपणे सरकारविरोधात लढाई अधिक मजबूत करतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. एआयटीयूसी कामगार केंद्र, अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संयुक्त किसान मोर्चा यांच्या वतीने सोमवारी देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, जगदाळे मामा हॉस्पिटल संघ, बांधकाम कामगार संघटना, बार्शी नगरपालिका संघटना व आरोग्य स्त्री परिचर संघटना उपस्थित होते. या वेळी कॉमेड ए. बी. कुलकर्णी, लहू आगलावे, लक्ष्मण घाडगे, आनंद गुरव, प्रवीण मस्तूद, अनिरुद्ध नखाते आदी उपस्थित होते. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Natepute Pratinidhi
शिक्षण संस्थेची झडती; सोमवारपासून तपासणी
सोलापूर जिल्हा

शिक्षण संस्थेची झडती; सोमवारपासून तपासणी

कथित भोंदूबाबा मनोहरमामा भोसले यांच्याशी आर्थिक संबंध असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भिगवण येथील एका शिक्षण संस्थेत करमाळा पोलिसांकडून सोमवारी रात्रीपासून चौकशी व कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. मात्र, पोलिसांनी अद्याप या कारवाईबाबत अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा पोलिसांचे पथक सोमवारी रात्री भिगवण जवळील शिक्षण संस्थेच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर संस्थेतील कार्यालयीन कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदी, संगणकीय माहिती तसेच अन्य संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी ही सकाळपासून रात्री उशिरा पर्यंतही पोलिसांची संस्थेतील उपस्थिती कायम होती. तसेच संस्थेशी संबंधित प्रा. राजेंद्र हुंबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

Natepute Pratinidhi
‘बाप समजून घेताना’ व्याख्यानामधून विद्यार्थ्यांना वडिलांच्या त्यागाची जाणीव
सोलापूर जिल्हा

‘बाप समजून घेताना’ व्याख्यानामधून विद्यार्थ्यांना वडिलांच्या त्यागाची जाणीव

आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून आयुष्यभर कष्ट करणाऱ्या वडिलांची किंमत मुलांनी ओळखली पाहिजे, या आशयाच्या विचारांनी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनाला स्पर्श केला. त्यांच्या भावनिक आणि प्रेरणादायी विचारांनी अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. वडिलांच्या कष्टांची जाणीव करून देणारे हे व्याख्यान विद्यार्थ्यांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेले. जवळगाव दत्तगुरु शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवळगाव नं. 2 येथे ‘बाप समजून घेताना’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांच्या ओघवत्या आणि प्रभावी वक्तृत्वाने उपस्थित विद्यार्थी भावूक झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाज मुलानी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

Natepute Pratinidhi
महिलांनी संविधानिक हक्कांची जाणीव करून घ्यावी
सोलापूर जिल्हा

महिलांनी संविधानिक हक्कांची जाणीव करून घ्यावी

संविधानाने महिलांना दिलेले अधिकार व हक्क यांची जाणीव महिलांना झाल्याशिवाय त्या सामाजिक बंधनातून पूर्णपणे मुक्त होणार नाहीत. घरातील परंपरा, कर्मकांडे, श्रद्धा, व्रत-वैकल्ये, उपवास-तापास यांसारख्या प्रथा महिलांनी स्वीकारल्या आहेत. त्यामुळे या प्रथा वर्षानुवर्षे नव्हे तर शतकानुशतके चालत आल्या आहेत. मात्र,त्यांचा चिकित्सक विचार करून महिलांनी स्वतःला या बंधनातून कधी मुक्त करणार असल्याचे प्रतिपादन अंनिसच्या संविधान जागर राज्य समन्वयक तथा मानवी हक्क व लैंगिक न्याय कार्यकर्त्या ॲड. परिक्रमा खोत यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) स्थापना दिन व क्रांती दिनानिमित्त मोहोळ शाखेच्या वतीने ‘महिलांशी सुसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच दरम्यान करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. मोहोळ अर्बन को-ऑप.बँकेच्या माजी अध्यक्षा संगिता फाटे अध्यक्षीय भाषणात संगिता फाटे यांनी उपवासाच्या प्रथेबाबत भाष्य केले.

Natepute Pratinidhi
शाळा, कॉलेजातील 300 विद्यार्थिनींनी सादर केली पारंपरिक नागपंचमीची गाणी
सोलापूर जिल्हा

शाळा, कॉलेजातील 300 विद्यार्थिनींनी सादर केली पारंपरिक नागपंचमीची गाणी

लाट्या बाई लाट्या.. चंदनी लाट्या, फू-बाई फू फुगडी फू..., काटवट कणा.., खिस बाई खिस... दोडका खिस, पिंगा गं पोरी पिंगा..., पावसाचं पाणी कवलात, पाटलाची लेक मी डौलात.., नाच गं घुमा कशी मी नाचू... अशा पारंपरिक गाण्यांवर विद्यार्थिनींच्या पावलांनी ठेका धरला. त्यानंतर उखाण्यांच्या जुगलबंदीने रत्नाई पारंपरिक नृत्य स्पर्धेत रंग भरले. अकलूज येथे संपन्न झालेल्या रत्नाई पारंपरिक नागपंचमी शालेय समूह नृत्य स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत महर्षी प्रशालेने एक लाखाचे पहिले बक्षीस पटकावले. सदाशिवराव माने विद्यालय व लक्ष्मीबाई कन्या प्रशाला आणि जिजामाता कन्या प्रशाला यांना विभागून द्वितीय क्रमांक पटकावला. तर उर्वरित तीन विद्यालयांना प्रत्येकी प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजन केले. शिक्षण प्रसारक मंडळ व प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजन केले होते. अकलूजमधील चार प्रशाला व तीन महाविद्यालयांतील सुमारे 300 विद्यार्थिनींनी पारंपरिक गाणी सादर केली. उद्घाटन सुलक्षणादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते केले.

Natepute Pratinidhi
दुरुस्तीनंतर 6 महिन्यांत बबलाद शाळेचे प्लास्टर कोसळल्याने 13 विद्यार्थी जखमी
सोलापूर जिल्हा

दुरुस्तीनंतर 6 महिन्यांत बबलाद शाळेचे प्लास्टर कोसळल्याने 13 विद्यार्थी जखमी

अक्कलकोट सहा महिन्यांपूर्वी अर्धवट दुरुस्त केलेल्या बाबलाद (ता. अक्कलकोट) येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या छताचा प्लास्टरचा काही भाग कोसळून दोन शिक्षकांसह 13 विद्यार्थी जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याबाबतची अधिक माहिती अशी, बबलाद (ता. अक्कलकोट) येथे जिल्हा परिषदेची कन्नड शाळा आहे. ही इमारत जीर्ण झाली असून, सहा महिन्यांपूर्वी तात्पुरती डागडुजी केली होती. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढली होती. नंतर ते विद्यार्थी शाळेत आले आणि शाळेतील व्हरांड्यात थांबून 15 ऑगस्टच्या ध्वजवंदन कार्यक्रमाची तयारी करत होते.

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा