राज्यात पावसाची तुफान फटकेबाजी:विदर्भातील 45 तालुक्यांत अतिवृष्टी, पुरात 5 जण वाहून गेले; मुंबईसह कोकणला येलो अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी रौद्र रूप धारण केले आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली असून, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, विदर्भात पावसाने हाहाकार उडवला असून पुरात वाहून गेल्याने पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.