Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

'हैदराबाद गॅझेटिअरने आरक्षण मिळत नाही:सरकारने समाजाला फसवले हे मनोज जरांगेंना आधीच सांगितले होते- शिवानंद भानुसे
महाराष्ट्र

'हैदराबाद गॅझेटिअरने आरक्षण मिळत नाही:सरकारने समाजाला फसवले हे मनोज जरांगेंना आधीच सांगितले होते- शिवानंद भानुसे

LATEST STORIES

नवीन बातम्या

139 निकाल
'हैदराबाद गॅझेटिअरने आरक्षण मिळत नाही:सरकारने समाजाला फसवले हे मनोज जरांगेंना आधीच सांगितले होते- शिवानंद भानुसे
महाराष्ट्र

'हैदराबाद गॅझेटिअरने आरक्षण मिळत नाही:सरकारने समाजाला फसवले हे मनोज जरांगेंना आधीच सांगितले होते- शिवानंद भानुसे

देवेंद्र फडणवीस, विखे पाटील अन् सर्वांत मोठे एकनाथ शिंदेंनी समाजाला फसवले हे सत्य आहे, जरांगे पाटील का फसत आहेत? त्यांनी फसू नये समजून घ्यावे, असे मराठा सेवा संघाचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे. हैदराबाद गॅझेटिअर लागू करून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसते, हे 2 सप्टेंबरचा शासन निर्णय निघण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना सांगितले होते असे त्यांनी बुलढाणा येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. शिवानंद भानुसे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मी साक्षीदार राहिलो आहे. मी त्यांच्या शिष्ट मंडळातही काम केले आहे. मुख्यमंत्र्यी आणि मंत्रिमंडळाशी देखील चर्चा केली आहे. मराठा सेवा संघाने 1990 पासून लढा सुरू केला होता मराठ्याचे ओबीसीकरण त्याच पद्धतीने हे आंदोलन पुढे सुरू होते. परंतु वाशीमध्ये सगेसोयरे हा मुद्दा ज्यावेळी आला त्यावेळी आम्ही त्याला विरोध केला होता.

Natepute Pratinidhi
'कॉकरोच जनता पार्टी'चे पुढील टार्गेट कोणते?:छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कोअर कमिटीची बैठक
महाराष्ट्र

'कॉकरोच जनता पार्टी'चे पुढील टार्गेट कोणते?:छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कोअर कमिटीची बैठक

नीट पेपरफुटी प्रकरणात थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास सरकारला भाग पाडणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'ची (CJP) सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे. जंतर-मंतरवरील ऐतिहासिक यशानंतर आता या संघटनेची पुढील वाटचाल कशी असेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर, पुढील रणनीती ठरवण्यासाठी पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी 2 दिवसीय अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राजकीय पक्ष की दबावगट? सीजेपीने भूमिका केली स्पष्ट जेन-झी (Gen-Z) तरुणांना त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरवणाऱ्या सीजेपीचे रूपांतर आता राजकीय पक्षात होणार का? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे

Natepute Pratinidhi
'गुंगी-गुडिया' टीकेवर सुनील तटकरे संतप्त
महाराष्ट्र

'गुंगी-गुडिया' टीकेवर सुनील तटकरे संतप्त

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या टीकेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल गुंगी गुडीया असा शब्दप्रयोग करत काँग्रेसने आपली वैचारिक दिवाळखोरीच दाखवून दिली आहे, अशा शब्दांत तटकरे यांनी काँग्रेसचा तीव्र निषेध केला. केवळ दिलगिरीने विषय संपत नाही काँग्रेसच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Natepute Pratinidhi
सिद्धिविनायक'च्या देणग्यांत घोळ?:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विशेष ऑडिटचे आदेश
महाराष्ट्र

सिद्धिविनायक'च्या देणग्यांत घोळ?:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विशेष ऑडिटचे आदेश

देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाचे 'विशेष लेखापरीक्षण' करण्याचे अत्यंत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. गेल्या 5 वर्षांत मंदिरात आलेल्या रोख देणग्या, सोने-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या हिशेबात मोठी अनियमितता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या सखोल चौकशीतून कोणते सत्य बाहेर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Natepute Pratinidhi
शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन:वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; शिक्षण, आरोग्यासह क्रीडा क्षेत्रावर शोककळा
महाराष्ट्र

शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन:वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; शिक्षण, आरोग्यासह क्रीडा क्षेत्रावर शोककळा

देशातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे शिक्षणमहर्षी, पद्मश्री पुरस्कार विजेते आणि बिहार तसेच त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे मंगळवारी कोल्हापुरात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली होती. बुधवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

Natepute Pratinidhi
धनुष्यबाण कुणाचा?:शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
महाराष्ट्र

धनुष्यबाण कुणाचा?:शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे? या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी बहुचर्चित असलेल्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार असून, आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील वकील कोर्टात आपला सविस्तर युक्तिवाद मांडणार आहेत. त्यामुळे या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्ट काय निरीक्षणे नोंदवणार आणि कोणता निर्णय देणार, याकडे संपूर्ण राज्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Natepute Pratinidhi
'आपले, संदिग्ध अन् विरोधी'; भाजपकडून मतदारांची गुपचूप वर्गवारी:रोहित पवार
महाराष्ट्र

'आपले, संदिग्ध अन् विरोधी'; भाजपकडून मतदारांची गुपचूप वर्गवारी:रोहित पवार

मतदार याद्यांमधील कथित गडबडी आणि निवडणूक आयोगाच्या 'SIR' मोहिमेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये SIR मोहिमेच्या माध्यमातून विरोधी विचारांच्या मतदारांची नावे वगळणे किंवा ती भलत्याच ठिकाणी दाखवण्याचे भयानक प्रकार संपूर्ण देशाने पाहिले आहेत. आता त्यातच भाजपने आपल्या 'BLA' मार्फत समांतर यंत्रणा उभी केली असून मतदारांची 'आपले', 'संदिग्ध' आणि 'विरोधी' अशी वर्गवारी केली जात आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

Natepute Pratinidhi
तुकाराम मुंढेंच्या FDA ला हायकोर्टाचे खडेबोल
महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंच्या FDA ला हायकोर्टाचे खडेबोल

राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षेसाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान एफडीएला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. नवी मुंबईतील एका बार-रेस्टॉरंटचा परवाना निलंबित केल्यानंतर पुनर्तपासणीत 100 टक्के नियमांचे पालन झाल्याचे स्पष्ट असूनही निलंबन मागे न घेतल्याबद्दल उच्च न्यायालयाने एफडीएच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Natepute Pratinidhi
किचनमध्ये अस्वच्छता, काजू कतलीत गंजलेली स्टेपलर पिन:ग्राहकाच्या सतर्कतेमुळे मुंबईतील बड्या मिठाईवाल्यावर मोठी कारवाई
महाराष्ट्र

किचनमध्ये अस्वच्छता, काजू कतलीत गंजलेली स्टेपलर पिन:ग्राहकाच्या सतर्कतेमुळे मुंबईतील बड्या मिठाईवाल्यावर मोठी कारवाई

मुंबईतील चर्नी रोड परिसरातील प्रसिद्ध तिवारी ब्रदर्स मिठाईवाला या दुकानाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. ग्राहकाने खरेदी केलेल्या काजू कतलीमध्ये गंजलेली स्टेपलर पिन आढळल्याची तक्रार केल्यानंतर एफडीएने दुकानाची तपासणी करत परवाना निलंबित केला आहे. या घटनेमुळे मिठाईच्या गुणवत्तेबाबत आणि अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्राहकाच्या तक्रारीनंतर एफडीएची तातडीची कारवाई ही घटना 1 ऑगस्ट रोजी समोर आली.

Natepute Pratinidhi
जायकवाडी धरण 85.24 टक्क्यांवर; गोदावरीकाठच्या 172 गावांना इशारा:32 हजार क्युसेक आवक; गेल्या वर्षी 4 ऑगस्टला धरणातून पहिला विसर्ग
महाराष्ट्र

जायकवाडी धरण 85.24 टक्क्यांवर; गोदावरीकाठच्या 172 गावांना इशारा:32 हजार क्युसेक आवक; गेल्या वर्षी 4 ऑगस्टला धरणातून पहिला विसर्ग

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. सद्य:स्थितीत धरण 85.24 टक्के भरले असून पाण्याची मोठी आवक पाहता मुख्य दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे आणि महसूल विभागाने छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, अहिल्यानगर, नांदेड व बीड या सहा जिल्ह्यांतील गोदावरी नदीकाठच्या 172 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Natepute Pratinidhi
देवेंद्र फडणवीसांच्या काकांचा विश्वास;माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल:‘देवाभाऊ’ पुस्तक प्रकाशित, चंद्रकांत पाटलांकडूनही मुख्यमंत्र्यांचे कौतुक
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या काकांचा विश्वास;माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल:‘देवाभाऊ’ पुस्तक प्रकाशित, चंद्रकांत पाटलांकडूनही मुख्यमंत्र्यांचे कौतुक

माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असा ठाम विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला. पुण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत बोलावून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारण्याची सूचना केल्याचा दावा खासदार संजय राऊत सतत करत आहेत.

Natepute Pratinidhi
पुढच्या रीलमध्ये पंतप्रधान मोदींनी लाठीमार झालेल्या विद्यार्थिनींची माफी मागावी- दिपके
महाराष्ट्र

पुढच्या रीलमध्ये पंतप्रधान मोदींनी लाठीमार झालेल्या विद्यार्थिनींची माफी मागावी- दिपके

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी संसद भवनावर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमारावरून आता मोठा वाद पेटला आहे. याप्रकरणी अभिजित दिपके यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे पोलिस प्रशासन आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा