पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट
संसदीय अधिवेशनादरम्यान मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 10 केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. या वेळी मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि अन्यायकारक टोलच्या मुद्द्यावर त्यांनी नितीन गडकरींचे लक्ष वेधले असून, यावर गडकरींनी तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. सुनील तटकरे म्हणाले, संबंध अधिवेशनात लोकसभा मतदारसंघातील अनेक विषय मांडता आले नाहीत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या वेळेत काही जे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत, त्या संबंधातील मंत्र्यांना भेटलो. जवळपास 10 मंत्र्यांना मी भेटलो. माननीय पंतप्रधान मोदींची भेट झाली ती सदिच्छा भेट आणि मार्गदर्शनासाठी होती.